जळगाव । प्रतिनिधी
शुक्रवारी प्रचारातील पहिल्या टप्प्यात महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या स्वागतासाठी शहरातील महर्षी वाल्मिकी नगर, मालुसरे नगर, जैनाबाद, मेस्कोमाता नगर येथे प्रचार रॅली काढण्यात आली. प्रत्येक गल्लीतील सुवासिनींकडून आ. भोळेंचे औक्षण करण्यात आले.
शुक्रवारी दि. 15 रोजी पहिल्या टप्प्यात महर्षी वाल्मिक मंदिर येथे अभिवादन करून आ. राजूमामा भोळेंनी प्रचाराला सुरुवात केली. तेथून महर्षी वाल्मिक नगर, जैनाबाद, तानाजी मालुसरे नगर, दिनकर नगर, गुरुदत्त कॉलनी, मेस्को माता नगर परिसर, श्रीराम कॉलनी, दशरथ नगर, तळेले कॉलनी मार्गे माजी नगरसेविका रंजना भरत सपकाळे यांच्या घराजवळ समारोप झाला. रॅली मार्गात सर्व कष्टकरी, श्रमीक वर्गातील नागरिक सहभागी झाले होते. रॅलीत भाजपचे उज्वला बेंडाळे, नितीन इंगळे, विशाल त्रिपाठी, दिलीप पोकळे, विनोद देशमुख, दीपक सपकाळे, अशोक पारधे, राजूभाई मोरे, अनिल अडकमोल, दीपक सूर्यवंशी, कैलास सोनवणे, कांचन सोनवणे, भारती सोनवणे, रंजना सपकाळे, राहुल घोरपडे, मीनल पाटील, गीतांजली ठाकरे, निलेश तायडे, शुभम तायडे, शालिक सपकाळे, भरत कोळी, जिभाऊ वानखेडे, जयेश भावसार, सागर पाटील, गणेश बाविस्कर, अजय सोनवणे, आकाश इंगळे, आकाश रायसिंगे, अनिल पाटील, चेतन कोळी, पंकज सोनवणे, मनोज रायसिंगे, मीना बाविस्कर, वैशाली बाविस्कर, वैशाली पाटील, शारदा सोनवणे, दीपक कोळी, चेतन शर्मा, अनिता राणे, रेखा कुलकर्णी, कल्पेश सोनवणे, उमेश सोनवणे, पुष्पा तळेले, सुषमा चौधरी, आरती नाईक, भारती रंधे, नीला पवार, ममता जंजाळे, लता मोरे आदी उपस्थित होते.
पाथरवट समाजाची साथ
येथील खंडेलवाल समाज आणि अखिल भारतीय पाथरवट समाज महासंघाने शहर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला असल्याचे युवा जिल्हाध्यक्ष योगेश पाथरवट यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.