Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSatish Bhosale : एकाला बॅटने मारहाण, कारमध्ये नोटांचे बंडलं अन् ...

Satish Bhosale : एकाला बॅटने मारहाण, कारमध्ये नोटांचे बंडलं अन् हेलिकॉप्टरमधून एन्ट्री; आमदार धसांचा निकटवर्तीय सतीश भोसलेची बीडच्या शिरूरमध्ये दहशत

मुंबई | Mumbai

बीडमधील (Beed) संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच आता बीडमधील आणखी एक गुन्हेगारीची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ (Satish Bhosale) सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून यात भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा सतीश भोसले नावाचा कार्यकर्ता एका व्यक्तीला बेदम मारहाण करताना दिसत आहे. त्यामुळे भोसले याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्या अटकेची मागणी केली जात आहे.

- Advertisement -

सतीश भोसले हा गेल्या पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील (Shirur Kasar Taluka) झापेवाडी येथील रहिवासी आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या अनेकांना त्रास देऊन अमानुषपणे मारहाण करतो अशी तक्रार तालुक्यातील लोकांची आहे. त्याने शिरूर तालुक्यातील बावी गावात ढाकणे कुटुंबाला अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. भोसले याचा एका व्यक्तीच्या तळपायावर बॅटने मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो व्हिडीओ दोन वर्ष जुना असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, सतीश भोसले उर्फ खोक्या याला अटक करा आणि आमदार सुरेश धस यांच्यावर देखील गुन्हा (Case) नोंद करा अशी आक्रमक भूमिका घेत ग्रामस्थांनी बीडच्या शिरूर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आहे. जोपर्यंत सतीश भोसले आणि आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा पवित्रा नागरिकांनी (Citizen) घेतला आहे.

आलिशान गाड्या, पैशांची बंडलं आणि थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री; सतीश भोसलेकडे इतका पैसा आला कसा?

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी सतीश भोसलेने एकाला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर लगेचच भोसलेचा दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात तो नोटांची बंडलं गाडीच्या डॅशबोर्डवर टाकताना दिसून आला. तर तिसऱ्या व्हायरल व्हिडिओमध्ये तो थेट हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सतीश भोसलेकडे इतका पैसा आला कसा? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हरणाची शिकार करताना अडवले म्हणून सतीश भोसलेने मारहाण केली

शिरूर तालुक्यातील बावी गावात ढाकणे कुटुंबाला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसलेवर गुन्हा दाखल झाला आहे. हरणाची शिकार करताना अडवले म्हणून सतीश भोसले उर्फ खोक्याने आम्हाला अमानुष मारहाण केली. माझ्या वडिलांचे सर्व दात पडले आहेत, माझा पाय फ्रॅक्चर झाला आहे. आता आमच्या जीवितासहित धोका आहे, अशी आपबीती ढाकणे कुटुंबातील एका सदस्याने माध्यमांशी बोलतांना सांगितले.

आमदार सुरेश धस काय म्हणाले?

एका व्यक्तीला बेदम मारहाण करतांना आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या सतीश भोसलेचे नाव आल्यानंतर याबाबत धस यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “मी सतीश भोसले याला ओळखतो. तो कधी कधी माझ्याकडे येतो. परंतु तो पाठीमागे काय उद्योग करतो, हे थोडीच मला माहिती आहे. शंभर टक्के सतीश भोसले याच्यावर कारवाई झालीच (Beed News) पाहिजे. व्हायरल होणारा व्हिडीओ हा आताचा नसून दीड वर्ष जुना आहे. तो स्वत:ला बॉस समजतो म्हणून काय झालं? मीच बॉस म्हणून सांगत आहे की, भोसलेविरोधात कारवाई झाली पाहिजे. ही घटना महिलेच्या छेडीवरून घडली होती अशी माहिती मिळत आहे”, असे सुरेश धस यांनी म्हटले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...