Tuesday, March 25, 2025
Homeनगरआमदार थोरात यांचे विखेंना खुले आव्हान म्हणाले, जनतेच्या न्यायालयात समोरासमोर..

आमदार थोरात यांचे विखेंना खुले आव्हान म्हणाले, जनतेच्या न्यायालयात समोरासमोर..

राहाता |प्रतिनिधी| Rahata

डॉ. जयश्री थोरात यांच्यावर झालेली टीका ही एकटीवर नसून तमाम माता-भगिनींवर आहे. ज्यांनी टीका केली. ते विखे यांचा पट्टा बांधून फिरत आहेत. देशमुख बोलताना तुम्ही टाळ्या वाजवत होता. नेत्यांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे समोरील लोक टाळ्या वाजवतात. या घटनेला तुम्हीच जबाबदार असून एक वेळ विकास आणि दहशतीबाबत तुलना होऊनच जाऊ द्या, असे खुले आव्हान काँग्रेस पक्षाचे नेते आ.बाळासाहेब थोरात यांनी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे. आमच्या महिलांनी जाब विचारला तर कार्यकर्त्यांना मागे सारत पळून गेला, असा टोलाही त्यांनी डॉ.सुजय विखे यांना लगावला.
लोणी खुर्द येथील लोमेश्वर मंदिर परिसरातील मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खा.भाऊसाहेब वाकचौरे, खा.निलेश लंके आदी होते. आ. थोरात म्हणाले, धांदरफळ येथील सभेमध्ये वसंत देशमुख वाईट बोलला. तेव्हा विखे टाळ्या वाजवत होते. म्हणून या घटनेला तुम्ही जबाबदार आहात.

- Advertisement -

संगमनेर तालुका चळवळीचा आहे. संगमनेरच्या नादाला लागू नका. अंभोरे येथील सभेत नाटकी भाषणे सर्वांनी पाहिली आहेत. खरी दहशत कुठे आहे एकदा जनतेच्या न्यायालयात समोरासमोर होऊन जाऊ द्या, असे आव्हान आ. थोरात यांनी दिले. महसूल मंत्री असताना शेती महामंडळाच्या जमिनी मी वाटल्या. निळवंडे धरण पूर्ण करून पाणी मी आणले. तुम्ही फक्त पाणी सोडले. अगदी ज्यांनी या कामात मदत केली त्या ज्येष्ठ नेते पिचड यांना तुम्ही धरणावर सुद्धा नेले नाही. किती हा कृतघ्नपणा? संगमनेर तालुक्यातील विरोधक सुद्धा आमचा आदर करतात.

आम्ही त्यांना सन्मानाने वागवतो. गणेश कारखाना आम्ही चांगला चालवला. 3000 रुपये भाव दिला. तुम्ही प्रवरानगर कारखान्यात मागील दहा वर्षे काय भाव दिला? ते जनतेला सांगा. मी डॉ.जयश्रीचा बाप आहे तसा स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांचा मुलगा आहे. हे विसरू नका, असा इशारा त्यांनी दिला. खा.निलेश लंके म्हणाले, प्रवरा परिसरात मोठी दहशत आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही करू नका, अन्यथा उलटी गिनती आम्ही देखील करू शकतो.

डॉ. जयश्री रडली नाही
तुम्ही वसंत देशमुखला पुढील वेळी भाषणासाठी वेळ वाढवून देतो म्हणता, ही कोणती प्रवृत्ती आहे? महिला भगिनींचा अपमान करणार्‍या तुमच्या प्रवृत्तीला आमच्या महिलांनी जाब विचारला तर तुम्ही कार्यकर्त्यांना मागे सोडून पळून गेला. तुम्ही मर्द होता, तर का लपून पळाले? धांदरफळ सभेमध्ये स्थानिक कुणीही नव्हते. तेथे अत्यंत खालच्या पातळीवर टीका झाली. पण डॉ.जयश्री रडली नाही, असा टोलाही आ.थोरात यांनी लगावला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...