Thursday, January 8, 2026
Homeनगरराज्यात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार

राज्यात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार

आमदार बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला विश्वास

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

राज्यात महाविकास आघाडीला खूप चांगले वातावरण असून मला खात्री आहे की आम्ही 180 जागा पार करूशकतो आणि मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच बसेल असा विश्वास काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. जोर्वे या गावी मतदान करण्यास जाण्यापूर्वी माध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिकपणे संवाद साधताना आमदार थोरात म्हणाले, माझ्या दृष्टीने कोणी दावे केले असतील, कोणी बोलले असेल. पण आम्हांला महायुतीचे भ्रष्ट सरकार घालवणे प्राधान्याचे आहे. एकदा महाविकास आघाडी आली की कोणीही मुख्यमंत्री होवू आणि चांगले सरकार चालवू. मंत्री विखे यांच्याकडे बख्खळ माया जमा झाली आहे. त्याच आधारावर दुसर्‍यांना संपवून टाकू अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाण्याचा प्रयत्न त्यांचा होता. मात्र, तो फोल ठरला आहे. या जनतेने दाखवून दिले की येथे काही चुकीचे चालत नाही, अशी टीकाही त्यांनी विखे परिवाराचे नाव न घेता केली.

- Advertisement -

आमदार सत्यजीत तांबे म्हणाले, ही अतिशय ऐतिहासिक निवडणूक संगमनेरकर बघत आहेत. आमदार थोरात नवव्यांदा एकाच पक्षातून एकाच मतदारसंघातून लागोपाठ निवडून येण्याचा एक मोठा विक्रम राज्यामध्ये करत आहेत. म्हणून त्यांच्या पाठिशी जनता एका वेगळ्या भूमिकेतून बघत आहे. इतरवेळेस आपण त्यांना मतदान करतो. मात्र आता एका राज्याच्या नेत्याला मतदान करत आहे, एक राज्य पातळीवर मोठे नाव त्यांचे झाले आहे. म्हणून अभिमानाने लोक मतदानाला येताहेत. मतदानाची टक्केवारी देखील अतिशय चांगली आहे. सगळ्या संगमनेरकरांची आणि अहिल्यानगरची इच्छा आहे, की या तालुक्याला, जिल्ह्याला संधी मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

YouTube video player

ताज्या बातम्या

संपादकीय : ८ जानेवारी २०२६ – शहाणे होण्याची गरज

0
जनतेला आता राजकारण्यांची, नेत्यांची कमाल वाटायला लागली असेल. चेहर्‍यावर सोयीनुसार वेगवेगळे मुखवटे चढवायचे. तोच खरा चेहरा असल्याचे भासवायचे. गरज पडली तर मुखवट्याचे रंगही बदलायचे....