Sunday, November 17, 2024
Homeराजकीयमराठा आरक्षणासाठी आघाडी सरकार गंभीर नव्हते - आ. विखे

मराठा आरक्षणासाठी आघाडी सरकार गंभीर नव्हते – आ. विखे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार गंभीर नव्हते. न्यायालयात भूमिका मांडताना झालेल्या गंभीर चुकांमुळेच

- Advertisement -

मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला स्थगिती मिळाली असल्याचा आरोप माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

माध्यमांशी बोलताना आ. विखे पाटील म्हणाले की, सकल मराठा समाजाच्या राज्यात निघालेल्या 53 मोर्चाच्या संघटीत शक्तीने आरक्षणाच्या मागणीला खरी ताकद मिळाली. यासाठी अनेकांचे बलीदान झाले.

या सर्व सामाजिक एकजुटीचा विजय आरक्षणाच्या निर्णयात झाल्याकडे लक्ष वेधून आ. विखे पाटील म्हणाले की, मिळालेले आरक्षण कायमस्वरुपी टिकावे म्हणून ज्या गांभीर्याने महाविकास आघाडी सरकारने निर्णय करायला हवे होते ते न झाल्यानेच न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडण्यात सरकार कमी पडले असल्याचे विखे पाटील म्हणाले.

कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन नाही, पण आपले अपयश झाकण्यासाठीच कंगनाच्या विषयाला मोठे करून महाविकास आघाडी सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे. मुंबई महानगरपालिकेने जेवढी तत्परता कंगनाचे कार्यालय तोडण्यासाठी दाखवली तेवढी तत्परता नाले सफाईच्या वेळी का दाखवली नाही, असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला.

पावसाने शेतकर्‍यांना मोठ्या अर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. अधिवेशनात काही घोषणा होतील अशी अपेक्षा होती परंतु अधिवेशनात सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसलीच.राज्यात दूध उत्पादक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत असून सरकारने अधिक वेळ न दडवता मदत जाहीर करण्याची मागणी आ. विखे पाटील यांनी केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या