Saturday, September 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवतायंत; राज ठाकरेंची ज्ञानेश कुमारांवर टीका

सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवतायंत; राज ठाकरेंची ज्ञानेश कुमारांवर टीका

मुंबई | Mumbai
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे. ज्ञानेश कुमार हे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे वदवून घेण्यासाठी वापरले जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवत आहेत, अशी बोचरी टीका राज ठाकरे यांनी केली. गेल्या दोन दोन दिवसांपासून ज्ञानेश कुमार गप्प असल्याचे सांगत, त्यांना बोलते करणारेही कुठे दिसत नाही असा टोला राज ठाकरे यांनी लगावला,

राज ठाकरे काय म्हणाले?
सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवतायंत
ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवतायंत. असो , गेले २ दिवस ज्ञानेश कुमार हे गप्प झालेत आणि त्यांना बोलतं करणारे पण कुठेच दिसत नाहीयेत. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्याना हाताशी धरून आपण कसे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोत हे भारतीय जनता पक्ष सांगत होतं हे लक्षात आलं असेल. आणि यासाठी त्यांनी २०२५ पासून एसआयआर हे नवं अस्त्र हाती घेतलं आहे.

- Advertisement -

गणेश विसर्जन मिरवणुक, जुलुस-ए-गौसिया निमित्त पोलीसांचा ४८ तास पहारा; ‘असा’ असेल सुरक्षेचा प्लॅन

एसआयआरमध्ये काय घोळ झालेत आणि यावर निवडणूक आयुक्तच बोलत आहेत हे बघितल्यावर, एकच पर्याय दिसतो तो म्हणजे ही एसआयआरची संपूर्ण प्रक्रियाच रद्द केली गेली पाहिजे. आणि यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही मागणीच आहे की आत्ता झालेलं एसआयर पूर्ण रद्द करा, त्यात कसे घोळ झाले याची निष्पक्ष चौकशी करा आणि नव्याने ही प्रक्रिया करा.

तसेच , यापुढे सर्व निवडणुका व्होटिंग मशिनवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवरच घेण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे !तरच इतक्या वर्षांच सत्तेचं सत्य बाहेर येईल !

ताज्या बातम्या