Saturday, September 26, 2026
HomeनाशिकNashik Police News: गणेश विसर्जन मिरवणुक, जुलुस-ए-गौसिया निमित्त पोलीसांचा ४८ तास पहारा;...

Nashik Police News: गणेश विसर्जन मिरवणुक, जुलुस-ए-गौसिया निमित्त पोलीसांचा ४८ तास पहारा; ‘असा’ असेल सुरक्षेचा प्लॅन

नाशिक | प्रतिनिधी
तब्बल बारा दिवसांच्या मुक्कामानंतर लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी शुक्रवारी (दि. २५) सकाळी ११ वाजेपासून पारंपरिक जल्लोषात मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. विसर्जन सोहळ्यानंतर लगेचच रविवारी (दि.२७) जुलूस-ए-गौसियानिमित्त जुने नाशिकसह विविध भागांत मिरवणुका निघणार आहेत. एकापाठोपाठ येणाऱ्या या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व ग्रामीण पोलीस दलातील हजारो जवान सलग ४८ तास पहारा देणार आहेत.

शुक्रवारी सकाळी तैनात झालेला हा फौजफाटा शनिवारी पहाटे विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत कार्यरत राहील आणि त्यानंतर रविवारी सकाळी पुन्हा जुलूससाठी बंदोबस्तावर तैनात असेल. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीवर उच्च नायालयाच्या आदेशानंतर, प्रशासनाने डीजेचा कर्णकर्कश आवाज, डोळ्यांना इजा पोहोचवणारे लेझर लाईट्स आणि गुलालाच्या अवाजवी उधळणीवर बंदी घातली आहे.

- Advertisement -

Nashik Ganesh Visarjan Miraunuk: विसर्जन मिरवणुकीवर भद्रकालीचाच प्रभाव !२५ पैकी तब्बल १५ मंडळे;यंदा एका नवीन मंडळाचा समावेश

ड्रोन, सीसीटीव्हीचे कवच
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष डिजिटल नियोजन केले आहे. मिरवणूक मार्गावरील सर्व प्रमुख चौक व सिग्नलवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फीड थेट पोलीस आयुक्तालय व स्मार्ट सिटीच्या मुख्य नियंत्रण कक्षाला जोडले आहे. हवेतून ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने संपूर्ण गर्दीवर नजर ठेवली जाईल.

असा आहे सुरक्षेचा प्लॅन
४ उपायुक्त, ७ सहाय्यक आयुक्त, ४० निरीक्षक, १६७ सहाय्यक पोलीस व उपनिरीक्षक, २५०० अंमलदार (३ शिफ्ट), १३०० होमगार्ड, लोहमार्ग, मोबाईल-१ पथके, आरसीपी, झू आरटी, क्राईम ब्रान्च, एसआरपी

ग्रामीण पोलीस दल
१ अधीक्षक, २ अपर अधीक्षक, ८ उपअधीक्षक, ८० निरीक्षक, उपनिरीक्षक, २००० अंमलदार, १२०० होमगार्ड, ५ ते ६ दंगल नियंत्रण तुकड्या, ३ राज्य राखीव दल तुकड्या

ताज्या बातम्या

default-featured-image

Raj Thackeray : एसआयआर विरोधात ‘या’ तारखेला मुंबईत जनमोर्चा; मनसे-ठाकरे सेनेचा...

0
मुंबई | Mumbai देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांनी 'स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन' (एसआयआर) संदर्भातील काही निर्णय त्यांचे इतर दोन सहकारी सुखबीर सिंग...