Tuesday, May 7, 2024
Homeमुख्य बातम्यामनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहे. २ दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि- मनसेची युती(Uddhav-Raj Alliance) असल्याची चर्चा समोर येवू लागल्या होत्या. त्यानंतर आत्ता सर्वात मोठी बातमी समोर येत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकनाथ शिंदे (MNS Chief Raj Thackeray Meets CM Eknath Shinde) यांच्या भेटीला गेले आहेत..

- Advertisement -

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. ठाकरे गटाच्या ताकदवान नेत्या निलम गोऱ्हे (Shivsena Leader Nilam Gorhe) यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्याआधी मनसे नेते अभिजीत पानसे (Abhijeet Panse) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना भेटून एकत्र येण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली होती. पानसे यांनी वैयक्तिक भेट असल्याचे म्हटले होते. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहे. यामुळे उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहे.

Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन

दरम्यान, राज ठाकरे यांची ही भेट पूर्वनियोजित होती, असं बोललं जात आहे. मात्र महाराष्ट्रातील राजकीय स्थिती अस्थिर असताना हे दोन नेते एकत्र आल्याने या भेटीचे तर्क वितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे, आज (शुक्रवार, ७ जुलै) सकाळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या युतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती.

ठाकरे गटाला आणखी एक धक्का! नीलम गोऱ्हेंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

दोन्ही भावांमध्ये रक्ताचे नाते आहे, त्यांना एकत्र आणण्यासाठी इतर कुणाची गरज नाही, अशा आशयाचे विधान संजय राऊतांनी केले होते. त्यामुळे येत्या काळात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र दिसतील, असे बोलले जात आहे. पण आता अचानक राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

- Advertisment -

ताज्या बातम्या