Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray : महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारले; म्हणाले, "कितीही...

Raj Thackeray : महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारले; म्हणाले, “कितीही बेताल…”

मुंबई | Mumbai

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती असून त्यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान आहे. त्यामुळे संपूर्ण देशात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट करत महाराष्ट्रातील वाचाळवीरांना चांगलेच फटकारले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Pune Helicopter Crash : पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले; तिघांचा मृत्यू

राज ठाकरेंनी पोस्टमध्ये (Post) म्हटले आहे की, “आज महात्मा गांधींची जयंती. ‘बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला, असं गांधीजी म्हणायचे. त्यांच्या या म्हणण्यातला ‘मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर याचा खोल अर्थ मात्र हल्ली समजेनासा झाला आहे. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्टीवर कुठलाही विचार पूर्ण व्हायच्या आत व्यक्त व्हायचं,हे सध्या सुरु आहे. आणि महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस आलेत,असे ते म्हणाले आहेत.

हे देखील वाचा : पुण्यात कोसळलेल्या ‘त्या’ हेलिकॉप्टरने खासदार सुनील तटकरे करणार होते प्रवास

तसेच पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटले की, काहीही बोललं, कितीही बेताल वक्तव्य केली तरी प्रसिद्धी मिळते हे माहित झाल्यामुळे, असल्यांचा सुळसुळाट झाला आहे. आणि हे होतंय कारण माध्यमं यांना प्रसिद्धी देतात. आणि त्यात भर पुन्हा सोशल मीडियाची.या सगळ्यात ठेहराव निघून जातो, विचार उरत नाही. त्यामुळे माध्यमांनी पण या क्षणापुरता न विचार करता, पुढच्या अनेक दशकांसाठी आपण काय पेरतोय याचा विचार करायला हवा. गांधीजींनी जो विचार रुजवला तो त्यांच्या नंतर ७५ वर्षांनी देखील पुसणं शक्य नाही, कारण तो मंथनातून निर्माण झाला होता. याचं महत्व पटणं आणि सारखं व्यक्त होण्याची उर्मी मनातून रिक्त होणे, हीच गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...