Sunday, October 13, 2024
Homeमुख्य बातम्याMNS Jagar Yatra : रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे रस्त्यावर, अमित ठाकरे यांच्या...

MNS Jagar Yatra : रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे रस्त्यावर, अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात जागर पदयात्रा

मुंबई | Mumbai

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेने जागर पदयात्रा काढली आहे. पळस्पे ते मानगाव अशी १६ किलोमीटरची ही पदयात्रा असणार आहे. पळस्पे फाट्यावरून या पदयात्रेला सुरुवात झाली आहे. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्यासोबत या पदयात्रेत सहभाग झाली आहेत. आठ टप्प्यात मनसे ही पदयात्रा काढत आहे. तर या पदयात्रेच्या समारोपाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

यावेळी अमित ठाकरे म्हणाले की, १७ वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी आंदोलन करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना देशद्रोही म्हणणार असाल तर ह्या खराब रस्त्यामुळे अपघातात जे मृत्युमुखी पडले त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना काय म्हणायचं? मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न प्रचंड गंभीर आहे आज आम्ही शांततेत पदयात्रा काढतोय..पण तरीही काही सुधारणा होणार नसेल पुढचं आंदोलनात अधिक तीव्र, आक्रमक महाराष्ट्र सैनिक आणि कोकणी माणूस तुम्हाला अनुभवायला मिळेल असा इशारा त्यांनी दिला.

तसेच, आपण चंद्रावर स्वस्तात पोहोचलो. अवघा ६०० कोटींचा खर्च आला. मात्र, जवळपास १५ हजार कोटी खर्च करूनही गेल्या १७ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. हा आवाज आम्हाला सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणून आम्ही जागर यात्रा काढतोय. आज सगळ्यांना दिसेल की मनसेची ताकद किती आहे आणि कशा पद्धतीने आम्ही यात्रा काढतोय. वेगवेगळ्या ठिकाणाहून मनसेचे पदाधिकारी आले आहेत. इथल्या स्थानिक लोकांपर्यंत आम्ही हा मुद्दा पोहोचवणार आहोत. असंही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या