Tuesday, October 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजPolitical Special : मनसेना नेते अमित ठाकरे नाशिकमधून लढणार?

Political Special : मनसेना नेते अमित ठाकरे नाशिकमधून लढणार?

नाशिक | फारुक पठाण

नाशिक हा तसा महाराष्ट्र निर्माण सेनेचा (MNS) बालेकिल्ला मानला जातो, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शहरातील चार पैकी तीन आमदार (MLA) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून आले होते. आता आगामी विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) जोरदार तयारी पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. नाशिकवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे विशेष प्रेम अनेक वेळा दिसून आले आहे. पक्षाची घोषणा देखील त्यांनी नाशिकमध्ये केली होती. आता त्यांचे पुत्र व पक्षाचे युवानेते अमित ठाकरे (Amit Thackeray) विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा असून ते नाशिकमधून निवडणूक रिंगणात उतरणार अशी देखील जोरदार चर्चा आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द; ‘हे’ आहे कारण

२०२४ चा पक्षाचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा करण्यात आला आहे. तेव्हापासून मनसेनेने विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी केल्याची माहिती मिळाली आहे. तरी अमित ठाकरे कुठून निवडणूक लढणार हे अद्याप निश्चित नसले तरी नाशिकमधून देखील ते उमेदवारी (Candidacy) करू शकतात अशी चर्चा आहे. यामुळे स्थानिक मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. नुकताच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) सर्व १५ जागांचा आढावा घेतला असून स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून त्यांनी अहवाल घेतला.

हे देखील वाचा : मोठी बातमी! संजय राऊतांना मोठा झटका; ‘या’ खटल्यात १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा

स्थानिक पदाधिकारी, नेत्यांनी राज ठाकरे यांच्याकडे सर्व १५ जागांची मागणी केली असली तरी सर्वेनुसारच याबाबत वरिष्ठ पातळीवर असल्याचे मनसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी नुकताच राज्याचा दौरा केला. या दौऱ्यात (Tour) त्यांनी काही उमेदवारांची घोषणाही केली. या दौऱ्यानंतर त्यांनी मुंबईत (Mumbai) दोन दिवसांपूर्वी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत नाशिकसह मुंबई, ठाणे, पुणे ग्रामीण व शहराच्या विधानसभा जागांचा आढावा घेण्यात आला.

हे देखील वाचा : Nashik Accident News : नांदगाव-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, ४ जखमी

मनसेना पुन्हा चमत्कार करणार?

२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेनेचे १३ आमदार निवडून आले होते. त्यात नाशिक शहरातील चार पैकी तीन आमदारांचा समावेश होता. यानंतर २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत तब्बल ४० नगरसेवक मनसेनेचे निवडून आले होते. नंतर पक्षातील गटबाजीमुळे पक्षाची मोठी हानी झाली होती, मात्र आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा नव्या दमाने पक्षाची तयारी सुरू असून राज ठाकरे यांच्यासह अमित ठाकरे सतत नाशिकवर लक्ष देत आहेत. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत मनसेना पुन्हा चमत्कार करणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या