Sunday, January 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमतदार याद्या स्वच्छ करा, आणखी एक वर्ष…- मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मतदार याद्या स्वच्छ करा, आणखी एक वर्ष…- मनसे अध्यक्ष राज ठाकरे

EVMच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आक्रमक

मुंबई ।

पाच वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत मतदार याद्या स्वच्छ करा, एक वर्ष आणखी निवडणुका घेऊ नका, जगभरात ईव्हीएमवर निवडणुका कुठेच होत नाही. असे म्हणत त्यांनी बॅलेट पेपरवरच निवडणूक घ्यावी, निवडणुक EVM मशीनकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही असे मत राज ठाकरे यांनी आज रंगशारदा येथील मेळाव्यात व्यक्त केले.

- Advertisement -

जोपर्यंत दुबार मतदार बोगस मतदार मतदार याद्यातून वगळली जात नाही आणि मतदार यादीतील घोळ राज्य निवडणूक आयोगाकडून बाजूला केला जात नाही, तोपर्यंत निवडणुका न घेण्यावर विरोधक ठाम आहेत. असेही राज ठाकरे यांनी या वेळेस सांगितले आहे.

YouTube video player

या वेळी EVM मध्ये कसा घोळ होऊ शकतो याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. सदरचे प्रात्यक्षिक अमित उपाध्याय, व राहुल चिमणलाल मेहता यांचे कडून करून दाखविण्यात आले. यात मतदान प्रक्रीये EVM कसा घोळ होऊ शकतो याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी 1 नोव्हेंबर रोजीच्या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. सोबतच त्यांनी मी स्वत: लोकलने येईल, असेही यावेळी राज ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्या

प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकला उद्या ड्रोन शोचे आयोजन – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2026 रोजी पोलीस परेड मैदान नाशिक येथे मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी 9.15 वाजता होणार...