मुंबई | Mumbai
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) उपस्थितीत आज मुंबईत (Mumbai) पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यातून बोलतांना राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Elections) लागलेल्या निकालावर देखील संशय व्यक्त केला. तसेच सातत्याने भूमिका बदलण्यावरून होणाऱ्या टीकेवरही राज ठाकरेंनी भाष्य केले. याशिवाय मनसेच्या पदाधिकार्यांनी देखील कानपिचक्या दिल्या.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की,”मागील दोन महिन्यांत बरेच लोक मला भेटायला आले. विधानसभेच्या निकालानंतर राज्यात सन्नाटा निर्माण झाला होता. लोकांनाही या निकालाचे आश्चर्य वाटले, मिरवणुका निघाल्या नाहीत. लोकांमध्ये संभ्रम होता, असं कसं झाले. माझ्याकडे एक संघाचा माणूस आला होता. तो म्हणाला इतना सन्नाटा क्यू है भाय? अरे कोणी तरी जिंकलं असेल ना, सन्नाटा पसरला हे कसलं द्योतक आहे” असा सवाल राज ठाकरे यांनी केला. तसेच आपल्याला मतदान झालं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलेले नाही. लोकांनी केलेले मतदान कुठेतरी गायब झाले, असं होणार असेल तर निवडणुका न लढलेलं बरं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच्या गोष्टीचे आकलन सुरू आहे”, असेही त्यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत जे शरद पवार १० पैकी ८ खासदार निवडून आणतात, त्यांचे विधानसभा निवडणुकीत फक्त १० आमदार निवडून येतात, यावर विश्वासच बसत नाही. अजित पवार यांचा १ खासदार निवडून आला. अजित पवार यांचे चार-पाच आमदार निवडणूक येतील असे वाटले होते. त्यांचे ४२ निवडून आले. चार महिन्यांमध्ये लोकांच्या मनात इतका कसा फरक पडला. जिंकून आलेले रोज रात्री बायकोला सांगतात चिमटा काढा. बाळासाहेब थोरात ७ वेळा आमदार म्हणून जिंकून आले. ६० -७० हजार मातांनी निवडून यायचे, त्या बाळासाहेब थोरात यांचा १० हजार मातांनी पराभव होतो?”, असा प्रश्न देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच ते म्हणतील राज ठाकरे यांचा पराभव झाला म्हणून ते बोलतात, पण हे मी नाही बोलत तर जनता बोलत आहे”, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
पुढे ते म्हणाले की,”विधानसभा निवडणुकीत मनसेकडून कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील (Raju Patil) उमेदवार होते. त्यांचे स्व:तचे १४०० लोकांचं गाव आहे, पण त्या गावातानू त्यांना एकही मत मिळाले नाही.राजू पाटलांना स्वत:च्या गावातून एकही मत कसं मिळू शकत नाही. राजू पाटील जेव्हा खासदारकीला उभे होते तेव्हा देखील तिथे त्यांना मतदान झाले होते. मात्र, यावेळी त्या गावातून राजू पाटलांना एक पण मत पडले नाही”, असे म्हणत राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या निकालावर शंका उपस्थित केली.