नागपूर । Nagpur
विधानसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भाचा दौरा करत आहेत. सध्या राज ठाकरे नागपूरमध्ये असून जिल्ह्यातील १२ विधानसभा जागेचा ते आढावा घेणार आहेत. आज नागपूरमध्ये राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.
राज ठाकरे म्हणाले, फोडाफोडीचं राजकारण, जातीयवाद या सर्व गोष्टींना कारणीभूत शरद पवार आहेत. या गोष्टींची महाराष्ट्रात पहिली सुरुवात पवारांनी केली. पुलोद स्थापन झाले तेव्हापासून पाहिले तर १९७८ ला सरकार बनवणे, १९९१ साली शिवसेनेचे आमदार फोडले. गणेश नाईक, नारायण राणे गेले त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीला सुरुवात झाली. हे सगळं राजकारण शरद पवारांनी महाराष्ट्रात सुरू केले.
हे हि वाचा : पुण्यात भरपावसात शरद पवार, सुप्रिया सुळेंचं आंदोलन
तसेच, जातीचं विषदेखील त्यांनी कालवलं. १९९९ साली जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला त्या अगोदरचा महाराष्ट्र आणि त्यानंतरचा महाराष्ट्र तुम्ही बघा. कधी महापुरुषांची विभागणी जातीत झाली नव्हती. संताची ओळख आडनावांनी केली जात नव्हती. या सर्व गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या, असा महाराष्ट्र याआधी कधीच नव्हता असं सांगत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा शरद पवारांना टार्गेट केले.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, प्रत्येकाला निवडणुकीत उभं राहायचे आहे. आमच्यासाठी पोषक वातावरण आहे. लोक मागील पाच वर्षात जे झाले त्याला कंटाळले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पध्दतीने मतदान झाले, हे मतदान समजून घेतलं पाहिजे. या देशात एक गठ्ठा मुस्लिम समाजाने मोदी शहांविरोधात मतदान केले. भाजपने ४०० पार संविधान बदलणार असे वक्तव्य त्यांच्याच लोकांनी केल्याने काही लोकांनी मोदी शाह विरोधात मतदान केले.
हे हि वाचा : “नराधमाला पाठिशी घालणारं विकृत सरकार…”; भर पावसात उद्धव ठाकरे संतापले