मुंबई | Mumbai
अमेरिकेतील एपस्टीन फाइल्स बाहेर येण्याला सुरुवात झाली आहे. काल (१९ डिसेंबर) रोजी मोठ्या प्रमाणात माहिती उघड करण्यात आली आहे. सर्व फोटो आणि फाइल्स उघड होण्याला अजून वेळ लागणार आहे. त्यामधील काही ईमेल्समध्ये काही भारतीय नावे पुढे आली आहेत. यावरुन आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय राजकारणात मोठा भूकंप होणार आहे असे भाकित केले होते. त्यांनी आज पुन्हा एकदा या प्रकरणावर भाष्य केले आहे.
Modi’s on Board असा संदर्भ देत चव्हाण यांनी मोठा बॉम्ब गोळा टाकला आहे. त्यांनी भारताचे केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे नाव घेत मोठा खुलासा केला आहे. आता एपस्टिन प्रकरणात केवळ अंशताः पुरावे समोर आले आहेत. अजून याप्रकरणात मोठे धक्कादायक खुलासे होतील. त्यासाठी कदाचित आणखी काही आठवडे जावे लागतील असे सांगत त्यांनी सरकारकडून याविषयी खुलासा का होत नाही, हे सरकारलाच विचारा असा टोलाही लगालवला आहे.
मोदींचा काय संबंध?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदर्भ यामध्ये आला आहे, तो २०१४ चा आहे. तेव्हा जेफ्री एपस्टीनला शिक्षा झालेली होती. त्यामुळे एका गुन्हेगाराशी भारताच्या पंतप्रधानांचा काय संबंध आहे. अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत होते, त्यांचेही नाव या फाईल्समध्ये आले आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, एपस्टीन फाइल्स बाहेर येण्याला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी मोठ्या प्रमाणात माहिती उघड करण्यात आली आहे. सर्व फोटो आणि फाइल्स उघड होण्याला अजून वेळ लागणार आहे. यामध्ये साधारण 3500 फाईल्स असून हा 300 जीबी डेटा आहे. त्यामुळे या फाईल्समधील सर्व माहिती उघड होण्याला वेळ लागणार आहे. मात्र काही ईमेल्समध्ये पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे मोदी आणि एपस्टीन यांच्यात काय संबंध आहेत, हा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भारताच्या राजदूताचा समावेश?
तत्कालीन राजदूत हरदीपसिंग पुरी हे भारताचे प्रतिनिधी म्हणून अमेरिकेत होते असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. स्टीव्ह व्हॅलन नावाचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा सल्लागार होता, तो एपस्टीन याला विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांनी, मोदींशी भेटायचे आहे. एपस्टीन त्यावर म्हणतो की मी प्रयत्न करतो. मग काही दिवसानंतर तो सांगतो की मोदीज ऑन बोर्ड. म्हणजे मोदी भेटण्यासाठी तयार आहेत, असा तो ई-मेल आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की त्याचे आणि मोदींचे संबंध कुठे आणि कसे आले, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला आहे. तर मोदींचा संदर्भ २०१४ मधील असल्याची माहिती ही त्यांनी दिली.
३० वर्षांचा डेटा
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, एपस्टीन फाईल्समध्ये जवळपास ३० वर्षांचा डेटा आहे, ज्यात ईमेल्स, पत्रे, फोटोग्राफ, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि ऑडिओ रेकॉर्डिंग यांसारखे प्रचंड मोठे इलेक्ट्रॉनिक पुरावे आहेत. हा सर्व पुरावा एपस्टीनच्या विरोधात चाललेल्या खटल्यांमध्ये प्रस्तुत करण्यात आला होता, हा सर्व पुरावा आता अमेरिकेच्या कायदा मंत्रालयाकडे आहे. अॅटर्नी जनरल हे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या अधिकाराखाली काम करतात आणि सध्याच्या अटर्नी जनरल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सहा महिन्यांपूर्वी कायदा मंत्री म्हणून नियुक्त केले आहेत. ही सर्व कागदपत्रे त्यांच्या ताब्यात आहेत.
दरम्यान, पथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणात सरकारला प्रश्न विचारला असून त्यांनी नाव आलं म्हणजे त्यांनी गुन्हा केला असं गृहीत धरता येणार नाही. पण प्रश्न हा उरतोच की एपस्टीन आणि या नेत्यांचे संबंध कुठे आणि कसे आले असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. त्याला यापूर्वी 2008-09 मध्ये शिक्षा झाली आहे. म्हणजे तो गुन्हेगार आहे हे सर्वांनाच माहिती होतं. मोदींचा जो संदर्भ आहे. तो 2014 मधील आहे. एपस्टीन हा विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे हे माहिती असतानाही, देह व्यापार करतो हे माहिती असतानाही मग अमेरिकेत भारताचे राजदूत असलेल्या हरदीपसिंह पुरी यांचे ही नाव आले आहेत. पण त्यांच्या यामध्ये काही भूमिका आहेत हे सर्व शोधावे लागेल असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





