Saturday, June 15, 2024
Homeमुख्य बातम्याWomen Reservation Bill 2023 : मोदींचे महिला आरक्षण विधेयक हे मनुस्मृतीच्या रुपात,...

Women Reservation Bill 2023 : मोदींचे महिला आरक्षण विधेयक हे मनुस्मृतीच्या रुपात, आंबेडकरांची टीका

मुंबई | Mumbai

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेत मंगळवारी (१९ सप्टेंबर) महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं. नारी शक्ती वंदन अधिनियम असं या विधेयकाचं नाव असून या विधेयकाला लोकसभेत बहुतांश पक्षांनी पाठिंबा दिला आहे. देशातला प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने या विधेयकाला पाठिंबा दर्शवला असला तरी यावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. याचदरम्यान आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि काँग्रेसला फटकारले आहे.

आंबेडकर म्हणाले, आरक्षण आणि महिला सक्षमीकरणासाठी काँग्रेस अन् भाजपने काही केलेच नाही. महिला सक्षमीकरणासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनीच काम केले आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यामुळे महिला आरक्षणाचे श्रेय कुणाला द्यायचे असेल, तर ते फक्त बाबासाहेबांनाच द्यावे लागेल, असेही ते म्हणाले. या महिला आरक्षण बिलाच्या श्रेयासाठी भांडणारी काँग्रेस आणि भाजप हे दोघेही भारतीय समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी आणि जात, लिंग, धर्म आधारित सर्व प्रकारचा भेदभाव संपविण्यासाठी बाबासाहेबांच्या क्रांतिकारी कार्याला विसरलेत आणि बगल देत आहेत, असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

इथल्या पीडित समूहासाठी राजकीय आरक्षणाची मागणी करणारे बाबासाहेब आंबेडकर होते. काँग्रेसने पंचायतराज बिल आणण्याच्या दशकांपूर्वीच महिला सशक्तीकरणाचे सर्वात मोठे पाऊल असलेल्या हिंदू कोड बिलाचा मसुदा बाबासाहेबांनी तयार केला होता, याकडेही आंबेडकरांनी लक्ष वेधले. “महिला आरक्षण बिलाचे आम्ही स्वागत करतो, असे म्हणतानाच आरएसएस हे एससी, एसटी विरुद्ध ओबीसी असे भांडण लावत आहे, असा आरोप आंबेडकरांनी केला आहे. तसेच मोदींना हे आरक्षण २०३४ पर्यंत द्यायचे नसून फक्त या अर्धवट, भेदभाव आणि धूळफेक करणाऱ्या बिलातून राजकीय फायदा घ्यायचा आहे, असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या