Saturday, May 25, 2024
Homeनगरसाईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे निधन

साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे निधन

शिर्डी | शहर प्रतिनिधी | Shirdi

साईबाबांच्या प्रचार आणी प्रसार करण्यासाठी महत्वपूर्ण भुमिका बजावलेले साईबाबा संस्थानचे अत्यंत संयमी स्वभावाचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे करोना उपचारादरम्यान मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने शनिवारी मध्यरात्री दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शिर्डी तसेच देशभरातील साईभक्तांवर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

दरम्यान साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांना कोव्हिड संसर्ग झाल्याने त्यांच्यावर आठ दिवसांपासून नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने मेंदुची छोटी शस्रक्रिया करण्यात आली होती. शनिवारी मध्यरात्री अचानक त्रास जाणवू लागल्याने त्यांची प्रकृती अचानकपणे बिघडली आणी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

त्यांच्या निधनाने साईबाबा संस्थानमधील कमी कधीही न भरून येणारी आहे. काय घ्यायच आणि काय सोडायच याचे ज्ञान असलेला असा हे व्यक्तीमत्व होते, कुठल्याही परिस्थितीत संयम असणारे तसेच वर्तमान व वास्तवाचा मेळ घालणारा माणसाची एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. त्यांनी साईचरीत्राची अनेक भाषेत पुस्तके लिहिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणी मुलगी असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी नाशिक येथे होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या