Saturday, July 27, 2024
Homeनगरमोक्कातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मोक्कातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

खंडणीसाठी (Ransom) जेलमधून हस्तकामार्फत फोनद्वारे पैशाची मागणी (Demand) करण्याच्या प्रकरणात फरार असलेला मोक्कातील सराईत गुन्हेगार (Mokka Criminals) तनवीर मोहमदहानिफ रंगरेज रा. कोपरगांव याला एलसीबी पथकाने अटक (LCB Arrested) केली. त्याला श्रीरामपूर शहर पोलिसांच्या (Shrirampur Police) हवाली करण्यात आले आहे.

- Advertisement -

कांद्याच्या भावात तेजी कायम

सलीम ऊर्फ पाप्या खॉजा शेख हा साथीदारांना जामीन व इतर खर्चासाठी जेलमधून फोन करून तसेच त्याच्या हस्तकामार्फत फोनद्वारे पैशाची मागणी (Money Demand) करत असे. पैसे दिले नाही तर तुला पाहुण घेतो असे म्हणुन खंडणीची (Ransom) मागणी केल्याचे तपासाअंती निष्पन्न झाल्याने याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur City Police Station) भा. दं. वि. कलम 384, 385, 120 (ब), 34 सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कलम (मोक्का) 3 (1) (ख) (खख), 3 (2), 3 (4) प्रमाणे वाढीव कलमांचा अंर्तभाव करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात तनवीर रंगरेज हा निष्पन्न झाल्यानंतर तो फरार होता.

आंबेवंगण खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या दोन तासांत जेरबंद

एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना रंगरेज याच्याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रंगरेज हा कोपरगाव जवळील टाकळी फाटा (Takali Phata) येथे असल्याचे समजल्यानंतर एलसीबीच्या पोलिसांनी (LCB Police) त्या ठिकाणी सापळा लावून तनवीर रंगरेज याला पकडून श्रीरामपूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. तनवीर रंगरेज हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात पुणे, नगर पोलिसात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत आदी कलमान्वे पाच गुन्हे दाखल आहेत.

जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डी वाय एस पी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरिक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक फौजदार बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ रविंद्र पांडे, सुरेश माळी, पोना रविंद्र कर्डीले, पोकॉ सागर ससाणे, रोहित येमुल, बाळासाहेब गुंजाळ, संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.

‘त्या’ मनीषा विरुद्ध लोणीत आणखी एक गुन्हा दाखल

- Advertisment -

ताज्या बातम्या