Monday, June 17, 2024
Homeनगरविनयभंगाच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी जेरबंद; एलसीबीची कामगिरी

विनयभंगाच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी जेरबंद; एलसीबीची कामगिरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल असलेला व युवतीचा विनयभंग करून पसार झालेला सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गेवराई (जि. बीड) येथून जेरबंद केला. संदीप दिलीप कदम (वय 28 रा. डोंगरगण ता. नगर) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.

त्याच्याविरूध्द कोपरगाव तालुका, लोणी, तोफखाना, एमआयडीसी, कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल आहेत. दरम्यान कदम याने 13 जानेवारी 2022 रोजी एका युवतीचा विनयभंग केला होता. याप्रकरणी पीडित युवतीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. कदम विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तो पसार होता.

त्याचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, पोलीस अंमलदार बबन मखरे, मनोज गोसावी, सुरेश माळी, विशाल दळवी, संतोष लोढे, शंकर चौधरी, देवेंद्र शेलार, शिवाजी ढाकणे, बबन बेरड यांच्या पथकाने आरोपी कदम याला गेवराई येथून ताब्यात घेत अटक केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या