Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRBI Repo Rate : आरबीआयकडून रेपो रेट जारी; सर्वसामान्यांना धक्का, गृह कर्ज,...

RBI Repo Rate : आरबीआयकडून रेपो रेट जारी; सर्वसामान्यांना धक्का, गृह कर्ज, कार कर्जावर काय परिणाम होणार?

नवी दिल्ली | New Delhi

भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) रेपो रेट (Repo Rate) जारी करत पुन्हा एका सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नसून, रेपो रेट हा ५.५ टक्के कायम ठेवला आहे. यामुळे गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, कार कर्जावरील व्याजदरात कोणताही बदल होणार नाही. रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणताही बदल न करण्याची ही सलग दुसरी वेळ आहे.

- Advertisement -

गेल्या तीन दिवसांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पतधोरण बैठक (Monetary Policy Meeting) सुरु होती. आज या बैठकीचा शेवटचा दिवस होता. या दिवशी आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांनी याबाबत घोषणा केली आहे. आरबीआयच्या सहा पैकी पाच सदस्यांनी रेपो दरात कपात करण्याच्या विरोधात मतदान केले. यावेळी अनेक अर्थतज्ज्ञांना अशी अपेक्षा होती की, आरबीआय रेपो दरात ०.२५ टक्के कपात करून सर्वांना आश्चर्यचकित करेल. मात्र, बैठकीत रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

YouTube video player

दरम्यान, चालू आर्थिक वर्षासाठी महागाईचा अंदाज ०.५० टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे, ज्यामुळे राष्ट्रीय महागाईचा (inflation) अंदाज २.६ टक्क्यांवर आला आहे. ऑगस्टच्या बैठकीत, हा अंदाज ३.१ टक्के ठेवण्यात आला होता, जो पूर्वीच्या ३.७ टक्क्यांवरून कमी आहे. याचा अर्थ असा की आरबीआय सतत महागाईचा अंदाज कमी करत आहे.

वर्षभरात तीन वेळा रेपो रेटमध्ये कपात

मागील वर्षभरात रेपो रेटमध्ये तीन वेळा कपात करण्यात आली होती. यामुळे रेपो रेट जवळपास १०० बेसिस पॉइंट्स म्हणजे १ टक्क्यांनी कमी झाला होता. वर्षाच्या सुरुवातीला रेपो रेट ६.५ टक्के होता. हा रेपो रेट आज ५.५ टक्के निश्चित करण्यात आला आहे.

रेपो रेट म्हणजे नेमका काय?

रेपो रेट हा एक असा दर असतो, ज्यावर बँकांना आरबीआयकडून अल्पकालीन कर्ज मिळते. बँका याच पैशातून ग्राहकांना कर्ज पुरवठा करत असते. रेपो रेट कमी झाल्यास बँकांना मिळणारे कर्ज स्वस्त मिळते. त्यामुळे ग्राहकांना सुद्धा दिलासा मिळतो. या दरावरुन गृह कर्ज, वाहन कर्जासह इतर कर्जांवरील ईएमआय स्वस्त किंवा महाग होतात.

कर्जाचा हप्ता कसा ठरवला जातो?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर तीन महिन्यांनी नवीन रेपो रेट जारी करते. रेपो रेटवर कर्जाचे व्याजदर ठरवले जाते. हा रेपो रेट सर्व बँकांना फॉलो करावा लागतो. त्यावर आधारित कर्जावरील व्याजदर ठरवले जाते. त्यामुळे जर रेपो रेट बदलला नाही तर कर्जावर काहीच परिणाम होणार नाही.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...