Wednesday, November 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमंकीपॉक्सला घाबरु नका; सरकारकडून मार्गदर्शक सुचना जारी

मंकीपॉक्सला घाबरु नका; सरकारकडून मार्गदर्शक सुचना जारी

मुंबई | Mumbai
जगभरात काही ठिकाणी मंकीपॉक्स या आजाराची साथ दिसून येत आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य संकट घोषित केले. यानंतर मंकीपॉक्स संसर्गाचा वेग लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. राज्यात अद्याप तरी मंकीपॅाक्स या साथीच्या आजाराचा रुग्ण आढळून आलेला नसला तरी देखील खबरदारी म्हणून राज्य आरोग्य विभागाकडून मंकीपॅाक्स संदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाने काय म्हंटले?
मंकीपॅाक्स हा संसर्गजन्य आजार आहे, ज्यामध्ये बाधित व्यक्ती हा इतर व्यक्तींच्या संपर्कात आल्यास त्या व्यक्तींना देखील या आजाराची लागण होते. त्यामुळे मंकीपॅाक्सच्या प्रभावाखाली असणाऱ्या देशांमधून आलेल्या प्रवाशांना सर्विलन्समध्ये ठेवण्यासोबतच काही लक्षणे असल्यास संबंधित विभागांना सुचना करण्याचे आदेश एअरपोर्ट यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाला राज्य आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. राज्यात अद्याप तरी मंकीपॅाक्स या साथीच्या आजाराचा रुग्ण आढळून आलेला नाही, त्यामुळे काळजी करण्याचे कोणतही कारण नाही, असे राज्य आरोग्य विभागाचे उपसंचालक राधाकृष्ण पवार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

तसेच, मंकीपॉक्सच्या आजाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यामध्ये सर्व विमानतळ, बंदरे आणि आरोग्य विभागांना दक्ष करणे, चाचणी प्रयोगशाळा तयार करणे, तपासणीसाठी आरोग्य सुविधा तयार करणे, मंकीपॉक्सचा एखादा रुग्ण सापडल्यास तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात याचा सामावेश आहे. यानुसार राज्याने याबाबत सर्वेक्षण, प्रतिबंधक मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

मंकीपॉक्स संशयीत रुग्णांचे लक्षणे
अंगावर लाल पुळ्या येणे. तीव्र ताप. घसा खवखवणे. डोकेदुखी, अंगदुखी होते. हातापायांवर सूज येणे. कानामागे, जबड्याखाली, मांड्यांवर लाल पुटकुळ्या येणे. काही रुग्णांना घशात या पुटकुळ्या येऊ शकतात. त्यामुळे गिळताना त्रास होण्याची शक्यता होऊ शकते. संक्रमित व्यक्ती किंवा प्राण्याच्या संपर्कात आल्यानंतर आजाराची लक्षणे दिसण्यास पाच ते २१ दिवस लागू शकतात.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या