Friday, May 24, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबईत मान्सूनची हजेरी; पुढील २४ तासांत राज्यातील 'या' भागांत जोरदार कोसळण्याचा अंदाज

मुंबईत मान्सूनची हजेरी; पुढील २४ तासांत राज्यातील ‘या’ भागांत जोरदार कोसळण्याचा अंदाज

मुंबई | Mumbai

गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर गेलेल्या मान्सूनने (Monsoon ) अखेर मुंबईत (Mumbai) हजेरी लावली आहे. काल (दि.२३) रात्रीपासून मुंबई शहर, उपनगरात पावसाच्या हलक्या सरी कोसळताना दिसत होत्या. त्यानंतर आज (शनिवार) पहाटेपासून मुंबईसह उपनगरात पाऊस जोरदार बरसत आहे. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला असून राज्यातील इतर भागांत देखील पुढील २४ तासात जोरदार पाऊस (Rain) कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे…

- Advertisement -

हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तविलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात (Maharashtra) मध्य महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा आणि कोकणामध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कोकण किनारपट्टीवर तीव्र गतीने वारे (Wind) वाहणार असून मच्छिमारांना समुद्रात मासेमारी करण्यासाठी न जाण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आली.

“नवाब शरीफ यांचा केक कापायला आम्ही…”; फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचं प्रत्युत्तर

तसेच प्रादेशिक हवामान विभागाने (Regional Meteorological Department) मुंबईला २६ आणि २७ जून रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर येत्या तीन ते चार दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्येही मान्सून कोसळेल, असा अंदाज आहे.

दरम्यान, आजपासून ते मंगळवारपर्यंत रायगड, रत्नागिरीमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सिंधुदुर्गातही (Sindhudurg) सोमवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच सध्या मुंबईत पावसाचा जोर कमी असल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

“देवेंद्रजी, कुटुंब तुम्हालाही आहे हे लक्षात ठेवा, अन्यथा…”; उद्धव ठाकरे यांचा गर्भित इशारा

- Advertisment -

ताज्या बातम्या