Sunday, September 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMonsoon Update: मोठी बातमी! मान्सून कुठ पर्यंत आला? भारतात कधीपर्यंत दाखल होणार?...

Monsoon Update: मोठी बातमी! मान्सून कुठ पर्यंत आला? भारतात कधीपर्यंत दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट

मुंबई | Mumbai
उकाड्याने हैराण झालेले नागरिक आणि चातकासारखी पाण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी मान्सूनबाबत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आज 23 मे रोजी नैऋत्य मान्सूनने नैऋत्य अरबी समुद्र, आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन परिसर तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत यशस्वी प्रगती केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. मुंबईसह राज्याच्या विविध भागांत या काळात पावसाच्या सरी कोसळतील, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील 3 ते 4 दिवसांत मान्सून आणखी वेगाने पुढे सरकण्यासाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक परिस्थिती (Favorable Conditions) निर्माण झाली आहे. या आगामी काळात नैऋत्य व आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन क्षेत्र, बंगालच्या उपसागराचा आणखी मोठा भाग आणि उर्वरित अंदमान समुद्र मान्सूनच्या कक्षेत येण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

- Advertisement -

Nashik News: सिंहस्थ कामामुळे ऐन अधिक मासात रामकुंड कोरडठाक; उपजीविकेसाठी ७० कुटुंबांनी केली ‘अशी’ सोय

मान्सून केरळमध्ये लवकर पोहोचण्याची शक्यता
मान्सूनच्या अशा आगेकूचीचा अर्थ म्हणजे केरळ, तामिळनाडू, अंदमान निकोबार बेटे आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे मान्सून हा केरळमध्ये १ जूनच्या आसपास पोहोचतो, मात्र यावर्षी थोडा लवकरच तो केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ (Cyclone) निर्माण झालेले नाही. त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात कोणताही मोठा अडथळा येणार नसून तो सुरळीत पुढे सरकणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

घाईगडबडीत पेरण्या करु नका
मान्सूनच्या आगमनाचा अंदाज समोर आलेला असला, तरी हवामान विभागाने शेतकऱ्यांना एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. “पावसाचा संपूर्ण अंदाज घेऊनच शेतात पेरण्या करा,” असे आवाहन करण्यात आले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, सुरुवातीला पाऊस आला म्हणून जर शेतकऱ्यांनी लगेच घाईगडबडीत पेरणी केली आणि त्यानंतर पावसाने ओढ दिली (खंड पडला), तर बियाणांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. त्यामुळे पुरेशा पावसाची खात्री झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे कृषी तज्ज्ञ आणि हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजकारणात टीका करताना लक्ष्मणरेषेचे भान ठेवा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळले पाहिजेत. आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा, मात्र कौटुंबिक वादात...