Sunday, May 26, 2024
Homeमुख्य बातम्याMonsoon Session : मंत्री बिना तयारीने सभागृहात येतात, बाळासाहेब थोरात संतप्त

Monsoon Session : मंत्री बिना तयारीने सभागृहात येतात, बाळासाहेब थोरात संतप्त

मुंबई | Mumbai

विधानसभेतील ज्येष्ठ सदस्य आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आज सभागृहात आक्रमक झाले. मंत्री गांभीर्यपूर्वक प्रश्नांचा अभ्यास करत नाही, असा संताप थोरात यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

सभागृहाच्या कामकाजाच्या सुरुवातीचा तास हा प्रश्नोत्तराचा राहील हे आपण सर्वानुमते ठरविले. सभागृहाचे सदस्य अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर प्रश्नांना वाचा फोडत असतात. मंत्री मात्र या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाही, असे दिसते. मंत्री सभागृहात येताना कोणतीही तयारी करून येत नाही, माहिती घेऊन येत नाही. सर्व सदस्य सरकारकडून उत्तराची अपेक्षा ठेवतात. कोणताही मंत्री समाधानकारक उत्तर देत नाही प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी वारंवार उपमुख्यमंत्र्यांना उभे राहावे लागते हे या सभागृहाला शोभत नाही. विधानसभेच्या सन्माननीय अध्यक्ष यांनी मंत्र्यांना सक्त ताकीद द्यावी आणि विना तयारी सभागृहात येऊ नये अशा सूचना कराव्यात, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या