Thursday, May 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMonsoon Update : मोसमी पाऊस अंदमानात; महाराष्ट्रात कधी दाखल होणार?

Monsoon Update : मोसमी पाऊस अंदमानात; महाराष्ट्रात कधी दाखल होणार?

मुंबई | Mumbai 

- Advertisement -

हवामान विभागाने (IMD) व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे मंगळवारी (दि.१३ मे) नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार निकोबार बेटांवर (Nicobar Islands) मागील २४ तासांत सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे. दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात ६ जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील तीन ते चार दिवसात दक्षिण अरबी समुद्राचा (Arabian Sea) काही भाग, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र; दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती देखील भारतीय हवामान विभागाने दिली आहे. देशभरात गेल्या पन्नास दिवसांपासून सुरु असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे वातावरणात मोठे बदल झाले आहेत. त्याचा परिणाम मान्सूनच्या आगमनावरही होणार अशी चिन्हे दिसत आहेत.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, मान्सून यंदा नेहमीपेक्षा आठ ते दहा दिवस आधीच अंदमान निकोबार बेटांवर पोहोचण्याची शक्यता असून १३ मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने यापूर्वी जाहीर केला होता. त्याप्रमाणे मंगळवारी मान्सूनचे अंदमानात आगमन झाले आहे.

६ जूनला महाराष्ट्रात येणार?

दरम्यान, येत्या ६ जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. २७ मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल तसेच महाराष्ट्रात मान्सून ६ जून आसपास येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच येत्या ५ दिवस महाराष्ट्रातील (Maharashtra) बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस (Rain) पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सून पहिल्या टप्प्यात सरासरीपेक्षा जास्त राहील, जवळपास १०५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून यंदाच्या हंगामात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सुद्धा जास्त पाऊस पडेल अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली.

ऐन उन्हाळ्यात अवकाळीचा मारा

राज्यभरात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी (दि. १३) मुंबई, पुणे तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. मुंबईसाठी आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे आणि मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण कोकणासाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला असून अहिल्यानगरसह कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतील घाट भागातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने बुधवार १४ मे आणि गुरुवार १५ मेसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस विदर्भातील आकाश ढगांनी आच्छादलेले राहील. बुधवारी आणि गुरुवारी काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता हवामान विभागाने गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...