Wednesday, October 16, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरु होणार? हवामान विभागाने दिले महत्वाचे अपडेट

महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरु होणार? हवामान विभागाने दिले महत्वाचे अपडेट

मुंबई | Mumbai

राज्यातून नैऋत्य मान्सून (Monsoon) आठवड्याच्या शेवटी माघारी फिरण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून महाराष्ट्रातून एक्झिट घेण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) महत्त्वाची माहिती दिली आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव भागातून मान्सून माघारी फिरण्यास पुढील (Return Of Monsoon) दोन ते तीन दिवसात अनुकूल वातावरण आहे.

- Advertisement -

नैऋत्य मान्सूनने देशभरातून परतीचा प्रवास सुरू केला असून दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांतून मान्सून परतला आहे. याशिवाय मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांमधील विविध भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू आहे. महाराष्ट्रातूनही मान्सून ४ ऑक्टोबपरपासून परतण्यास सुरूवात होईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

दरम्यान, सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना पावसाची खूप गरज आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुजरातच्या काही भागातून मान्सून माघारी फिरला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रातील काही भागातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सरासरीच्या ९४.४ टक्के पाऊस झाला आहे. भारतात सरासरीच्या १०६ टक्के हा सामान्य पाऊस समजला जातो. भारतीय हवामान विभागाने ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान सामान्य पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.

राज्यात काही ठिकाणी पावसाने दडी मारल्याने परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली असून राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट कायम आहे. ५ ऑक्टोबरच्या आसपास मान्सून महाराष्ट्राच्या उत्तर भागातून परत जातो. उर्वरित राज्यातून जाण्यासाठी पाच ते दहा दिवस लागतात. २००५ साली २ सप्टेंबरला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. त्यानंतर २००७ साली ३० सप्टेंबरला परतीचा प्रवास सुरू झाला होता. म्हणजे मान्सूनचा आगमनाच्या तारखांपेक्षा मान्सूनच्या परतीच्या तारखांमध्ये विविधता दिसून येते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या