Monday, May 6, 2024
Homeजळगावजेडीसीसीसाठी 'या' मतदार संघातून सर्वाधिक अर्ज

जेडीसीसीसाठी ‘या’ मतदार संघातून सर्वाधिक अर्ज

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा बँकेच्या निवडणुकीची (District Bank Elections) रणधुमाळी सुरु झाली असून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी (candidates) अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. त्यामध्ये इतर संस्था मतदार संघातून (Other organizations) सर्वाधिक 50 उमेदवारांनी अर्ज दाखल (Application filed) केले आहे. तर सर्वात कमी धरणगाव, पारोळा व एरंडोल विकासो मतदार संघातून प्रत्येकी 4 अर्ज दाखल करण्यात आले असल्याने या जागांवरील उमेदवारांची निवड बिनविरोध मानली जात आहे.

- Advertisement -

इतर निवडणुकींप्रमाणे सहकार क्षेत्रातील जिल्हा मध्यवर्ती बँकेची रणधुमाळी सुरु झाली आहे. अनेक आजी माजी नेते मंडळींसह आमदार, खासदारांनी देखील जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेकांनी ही संधी साधत सकाळपासूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बँकेच्या आवारात गर्दी केली होती. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व काँगे्रस या पक्षांनी सर्वच जागांवर आपले उमेदवारांचा अर्ज भरला असल्याने निवडणुकीत अधिकच चुरस निर्माण झाली आहे. मात्र असे असले तरी 21 जागांपैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्या असल्याने हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मतदार संघ निहाय उमेदवारांचे अर्ज

जिल्हा बँकेच्या विडणुकीसाठी सर्वाधिक अर्ज इतर संस्था मतदार संघातून 50, महिला राखीव मतदार संघातून 40, इतर मागास वर्गीय मतदार संघातून 40, अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून 16, चोपडा विकासो मतदार संघातून 15, जळगाव विकासो मतदार संघातून 11, चाळीसगाव व भडगाव विकासो मतदार संघातून प्रत्येकी 9, भुसावळ विकासो मतदार संघातून 8, मुक्ताईनगर, अमळनेर, पाचोरा, यावल विकासो मतदार संघातून प्रत्येकी 7, जामनेर व बोदवड विकासो मतदार संघातून प्रत्येकी 6 तर धरणगाव, एरंडोल व पारोळा विकासो मतदार संघातून प्रत्येकी 4 या प्रमाणे उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.

महिला राखीवसाठी 40 अर्ज

जिल्हा बँकेच्या संचालक पदांसाठी 2 जागा महिलांसाठी राखीव आहेत. या दोन जागांसाठी जिल्हाभरातून तब्बल 40 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महिलांनी संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.

आज छाननी

शेवटच्या दिवशी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. बुधवारी या अर्जांची छाननी प्रक्रिया होणार आहे. त्यानंतरच निवडणुकीच्या रिंगणातून अर्जातील त्रुटींमुळे अनेकांचे अर्ज बाद होतात. त्यामुळे कोणा कोणाचे अर्ज बाद होतात याकडे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या