Tuesday, April 29, 2025
Homeधुळे24 तासांत मोटारसायकल व मोबाईल चोरी करणार्‍यास अटक

24 तासांत मोटारसायकल व मोबाईल चोरी करणार्‍यास अटक

दोंडाईचा । Dondaicha श.प्र.

दोंडाईचा पोलीसांनी (police) 24 तासात मोटरसायकल (motorcycle) व मोबाईल (mobile phone) चोरी (thief) करणार्‍याला अटक (arrested)केली. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

चैनी रोड येथील राहणारे योगिता रवींद्र नेतले यांच्या किराणा दुकानावरून 12 हजार रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन चोरीस गेला होता. याप्रकरणी योगेश शिवाजीराव वाडीले (भोई) वय 34 रा. रंजाने ता. शिंदखेडा यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीतील मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेला आहे.

तसेच दुसर्‍या घटनेत कन्हैयालाल लोटन भिल, कोकराळे ता. नंदुरबार यांची 20 हजार रुपये किंमतीची मोटरसायकल क्र. एम. एच. 18 पी 3815 ही दि. 10/4/2023 रोजी दुपारी 12 ते 4 वाजेच्या दरम्यान बस स्टँड समोरून हॉटेल जवळून चोरीस गेली होती. या प्रकरणी विजय नारायण भिल रा. चिलाने, ता. शिंदखेडा याला अटक केली. त्याच्याकडून चोरीतील मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल संदीप कदम, अनारसिंग पवार, प्रवीण निंबाळे, प्रेमराज पाटील, अनिल धनगर यांच्या पथकाने केली. सदर चोट्यांकडून आणखी इतर चोरीचे गुन्हे उघडकीस येतील असे पोलीसांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Decision : सुधारित पीकविमा योजनेसह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले...

0
मुंबई | Mumbai मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री...