Monday, June 24, 2024
HomeनाशिकNashik Crime News : मोटारसायकली चोरणारे जेरबंद; आठ लाखांच्या 'इतक्या' दुचाकी हस्तगत

Nashik Crime News : मोटारसायकली चोरणारे जेरबंद; आठ लाखांच्या ‘इतक्या’ दुचाकी हस्तगत

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

- Advertisement -

येथील पंचवटी गुन्हे शोध पथकास (Panchavati Crime Investigation Team) दोन दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेण्यात यश आले आहे. या संशयितांकडून जवळपास आठ लाख ३० हजार रुपयांच्या एकूण १९ मोटारसायकली (Motorcycle ) हस्तगत करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात (Panchvati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक डी.एम. वणवे करीत आहेत….

Video : नाशकात गणरायाचे जल्लोषात स्वागत

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक शहरात (Nashik City) वाढती दुचाकी चोरी बघता संबधित पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हे उकल करण्याचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे (CP Ankush Shinde) यांनी आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल शिंदे यांनी गुन्हे शोध पथकाला मार्गदर्शक सुचना केल्या होत्या. गुरूवार (दि.१४) रोजी पंचवटी परिसरात गस्त घालत असताना एक दुचाकी चोर काट्या मारुती चौकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Nashik News : नाशकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गोपीचंद पडळकरांविरोधात ‘जोडो मारो’

त्यानुसार पोलिसांनी (Police) सापळा रचला होता. यावेळी संशयित राजू प्रकाश पिंपळे (वय ४०, राहणार बाजीराव गोदकर बस्ती, सनन हॉटेलच्या पुढे, शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर) यास ताब्यांत घेतले असता विना नंबरप्लेट दुचाकी त्याचा साथीदार शोयब गफुर शेख (वय २४, राहणार नांदुर मध्यमेश्वर रोड शेख वस्ती) याच्यासमवेत अहमदनगर येथून चोरल्याची माहिती दिली. त्यानंतर या संशयितांची कसून चौकशी केली असता नाशिक शहर, औरंगाबाद, अहमदनगर येथून चोरल्याची कबुली दिली. यानंतर संशयित शोयब शेख यास देखील ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही संशयितांकडून एनफिल्ड कंपनीच्या बुलेट ०४, बजाज कंपनीच्या पल्सर ०३, होंडा कंपनीच्या युनिकॉर्न ०३, होंडा कंपनीच्या स्पेल्डर ०६, इतर कंपनीच्या ०३ अशा एकूण १९ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.

Women Reservation Bill : महिलांना नवीन आरक्षण विधेयकातून काय मिळणार? कसा आहे त्याचा प्रवास? जाणून घ्या सविस्तर

दरम्यान, सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित केदार, मिथुन परदेशी, सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक काकड, वनवे, पोलिस हवालदार कुलकर्णी, गुंबाडे, पोलिस नाईक नांदुर्डीकर, शिंदे, भोईर, मालसाने, शिंदे, लोणारे, पोलिस अंमलदार पवार, जाधव, पवार, सावळे, महाले, पचलारे, परदेशी, कैलास कचरे यांनी संयुक्तपणे कामगिरी केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Devendra Fadnavis : अजित पवारांना लबाड लांडग्याचं पिल्लू म्हणणाऱ्या पडळकरांच्या वक्तव्यावर फडणवीसांचे स्पष्टीकरण, म्हणाले…

- Advertisment -

ताज्या बातम्या