Monday, September 23, 2024
Homeनगर..तर विखे-थोरात संघर्ष संपेल !

..तर विखे-थोरात संघर्ष संपेल !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

आ. राधाकृष्ण विखे पाटील आणि संगमनेरचे आ. बाळासाहेब थोरात यांच्यात काही मुद्द्यावर संघर्ष आहे. जोपर्यंत संबंधीत मुद्दे संपत नाही, तोपर्यंत सुरू असणारा संघर्ष सुरू राहणार आहे. संगमनेरमधील वेगळ्या पध्दतीने राजकारण बंद झाल्यास विखे- थोरात संघर्ष देखील संपेल, असे सुचक वक्तव्य भाजप खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर खा. डॉ. विखे बोलत होते. ते म्हणाले, विखे आणि थोरात यांच्यात काही मुद्द्यावर संघर्ष आहे. विखे यांची मूळ भूमिका संगमनेरमध्ये होणारी वाळूतस्करी, बेसुमार वाळू उपसा, अवैध गौण खनिज प्रकरणाला विरोध करणारी आहे. ते सुरू राहिल्यास आ. थोरात यांच्यासोबत संघर्ष सुरू राहिल.

दुसरीकडे विखे- तांबे असा संघर्ष कधीच नव्हता. गेली 10 ते 15 वर्षे डॉ. तांबे यांनी पदवीधर मतदारसंघात चांगले काम केलेले आहे. त्यांच्या बद्दल कोणाचे मत वाईट नाही. दुसरीकडे संगमनेरचे लोकप्रतिनिधी असणारे आ. थोरात यांनी वेगळ्या पध्दतीने राजकारण थांबल्यास विखे- थोरात संपेल अशी अपेक्षा खा. विखे यांनी व्यक्त केली.

नाशिक पदवीधर निवडणुकीचा निर्णय घेण्याचे अधिकारी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी स्थानिक पातळीवर दिले होते. त्यानुसार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील आणि आ. राम शिंदे यांनी नगर जिल्ह्यातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती माजी आ. शिवाजी कर्डिले यांनी दिली. कर्डिले म्हणाले, सत्यजीत तांबे हुशार आणि अभ्यासू युवा नेतृत्व आहे. यासह ते जिल्ह्याचे सुपूत्र असल्याने भविष्यात जिल्ह्याच्या कामात आणि शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास तांबे यांच्या माध्यमातून प्रयत्न होतील, हा विचार करून भाजपने तांबे यांना पाठींबा दिला. निवडणुकीच्या निकालानंतर तांबे यांच्या भाजप प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील, असेही कर्डिले म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या