Tuesday, July 16, 2024
Homeनाशिकशिवसेना खासदार हेमंत गोडसे करोना 'पाॅझिटिव्ह'

शिवसेना खासदार हेमंत गोडसे करोना ‘पाॅझिटिव्ह’

नाशिक/नाशिकरोड/देवळाली कॅम्प | Nashik/Nashikroad/Deolali Camp

- Advertisement -

नाशिकमधील शिवसेनेचे खासदार हेमंत तुकाराम गोडसे यांना करोनाची लागण झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान, खासदार गोडसे त्यांच्या राहत्या घरीच होम क्वॉरंटाइन झाले आहेत.

तसेच गेल्या काही दिवसांत जे कुणी त्यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी करोनाची टेस्ट करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

दोन दिवसांपासून करोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यामुळे त्यांनी करोनाची टेस्ट करवून घेतली. आज या टेस्टचे अहवाल प्राप्त झाले असून यात खासदार गोडसे करोनाबाधित आढळून आले आले आहेत.

आपली करोना टेस्ट पाॅझिटिव्ह आल्याची माहिती खासदार गोडसे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.

यादरम्यान, काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी वैद्यकीय सल्ल्याने गरज असल्यास स्वतःची करोना चाचणी करावी असे आवाहन गोडसे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या