Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNarayan Rane : दिशा सालियन प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद - खासदार नारायण...

Narayan Rane : दिशा सालियन प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद – खासदार नारायण राणे 

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

अभिनेता सुशांतसिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात (Disha Salian Death Case) मुंबई पोलिसांची (Mumbai Police) भूमिका संशयास्पद असल्याची टीका भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी शनिवारी येथे केली. सालियन प्रकरणात पोलिसांनी पुरावे असूनही तेव्हा कारवाई का केली नाही? असा सवाल करत राणे गृह खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिशा सालियान प्रकरणात आदित्यचे नाव घेऊ नका, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दोनदा दूरध्वनीवरुन केली होती, असा दावाही राणे यांनी केला.

- Advertisement -

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी फेरचौकशी व्हावी, या मागणीसाठी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली आहे. या याचिकेचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनात उमटून सत्ताधारी पक्षाकडून या प्रकरणी आदित्य ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी आज भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना पोलिसांना हाताशी धरत दिशा सालियान मृत्यू प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला.

मुंबईच्या तत्कालिन महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाच्या वडिलांवर दबाव टाकला होता. या दबावामुळेच त्यांना त्यावेळी तशी प्रतिक्रीया देण्यास भाग पाडले. हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा कर्ता करविता निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे होता. त्यामुळे सरकारने आता नव्याने एफआयआर दाखल करून आरोपींना अटक करावी, अशी मागणी राणे यांनी केली.

दिशाच्या वडिलांनीच कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्यावेळी केलेल्या दिरंगाईबद्दल जाब विचारावा आणि दोषी  अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणीही त्यांनी केली. दिशा सालियानला न्याय मिळायलाच हवा आणि या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान प्रकरणातील प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) सापडत नसल्याने पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे. त्याला असेल तिथून शोधून काढले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र दैवत मानतो. त्यामुळे त्यांचा अवमान कुणीही सहन करू शकत नाही. कोरटकर कितीही पळाला तरी त्याला अटक होऊन कारवाई होईलच, असा विश्वास नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...