Tuesday, September 17, 2024
Homeराजकीयठाकरेंनी घेतली आफ्रिकेत घोटाळा करणाऱ्यांची भेट; शिंदेंच्या खासदाराचे गंभीर आरोप

ठाकरेंनी घेतली आफ्रिकेत घोटाळा करणाऱ्यांची भेट; शिंदेंच्या खासदाराचे गंभीर आरोप

नवी दिल्ली । New Delhi

- Advertisement -

दक्षिण अफ्रिकेत अब्जावधींचा रॅण्ड घोटाळा करणाऱ्या गुप्ता बंधूंपैकी एक जण दिल्लीत आला होता, या गुप्ताची उध्दव ठाकरे यांनी भेट घेतली असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. या गंभीर आरोपाने खळबळ उडाली असून याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही म्हस्के यांनी आज केली. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

दक्षिण आफ्रिकेत गुप्ता बंधू यांनी अब्जावधी रुपयांचा रॅण्ड घोटाळा केला आहे. याप्रकरणातील एक आरोपी गुप्ता दिल्लीत आला होता, त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी त्याची अर्धा तास भेट घेतली असल्याची माहिती आपल्याकडे असल्याचे म्हस्के यांनी सांगितले.

गुप्ता आणि उध्दव ठाकरे यांची भेट उघड होऊ नये यासाठी दिल्लीतील संजय राऊत यांच्या घराच्या परिसरातले सीसीटीव्ही कदाचीत बंद ठेवले असतील. पण, या भागातल्या रस्त्यांवर सीसीटीव्ही आहेत यात हा प्रकार उघड होईलच याची तपास यंत्रणांनी दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी म्हस्के यांनी केली आहे.

हे ही वाचा : काल महायुतीला अल्टिमेटम, आज पवारांची भेट; बच्चू कडू महाविकास आघाडीच्या वाटेवर?

सत्ता गेल्यामुळे उध्दव ठाकरे यांच्याकडे कट आणि कमिशनचे कंटेनर येणं बंद झालं आहे. आता इलेक्शन फंड जमा करण्यासाठी ठाकरेंनी गुप्ता बंधूंची भेट घेतली नसेल ना? असा संशय ही त्यांनी व्यक्त केला.

म्हस्के पुढे म्हणाले की, राऊतांच्या बंगल्यात ७ तारखेला संध्याकाळी काळ्या काचेच्या गाडीतून कोण आलं होतं? वादग्रस्त गुप्ता बंधूना उध्दव ठाकरे नक्की कशासाठी भेटले याचा उलगडा जनतेसमोर झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

मला मुख्यमंत्री पद द्या अशी भीक उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस हायकामांडकडे मागितली, यासाठीच त्यांचा तीन दिवसीय लोटांगण दिल्ली दौरापार पडला. पण काँग्रेसने त्यांना हूसकावून लावले आहे. दिल्लीत त्यांना कुणी भाव दिला नाही,अशी टिका खासदार नरेश म्हस्के यांनी केली.

हे ही वाचा : अदानीनंतर आता कोणाचा नंबर? Hindenburg Research च्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

राष्ट्रवादीच्या एका नेत्यालाही मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यात उध्दव ठाकरे यांचा अडसर ठरू नये म्हणून त्यांना अडकवण्यासाठी संजय राऊतांनीच गुप्ता बंधूंची भेट घडवून आणलेली नाही ना? असा सवाल उपस्थित करून म्हस्के यांनी आघाडीतील बिघाडी दाखवून दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या