Wednesday, March 26, 2025
Homeनगरपालकमंत्री विखे यांचे आशीर्वाद घेऊन काम करणार

पालकमंत्री विखे यांचे आशीर्वाद घेऊन काम करणार

खासदार लंके यांची विखे परिवारावर स्तुतीसुमने

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात बोलावेच लागते. त्यावेळी माझ्याकडून एखादा शब्द गेला असेल, त्यांच्याकडूनही शब्द गेला असेल. मात्र, आता निवडणूक संपली आहे. आता आपण कोणाच्याही विरोधात बोलणार नाही. विखे पाटील परिवार जिल्ह्यातील मोठा परिवार आहे. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी उभा केला, याचा मला अभिमान आहे, अशा शब्दांत खासदार नीलेश लंके यांनी विखे पाटील परिवाराचे कौतूक करणारे वक्तव्य केले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आशीर्वाद घेऊन आपण काम करणार असल्याचेही खा. लंके म्हणाले.

- Advertisement -

केडगावातील सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर आदी उपस्थित होते. दरम्यान, विखे पाटील परिवाराविरूध्द लोकसभा निवडणूक लढवून विजयी झालेल्या लंके यांनी विखे पाटील परिवाराचे कौतूक करणारे वक्तव्य केल्याने आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

खा. लंके म्हणाले, ‘विखे पाटील कुटुंबाचे विकासात मोठे योगदान आहे. मी महाराष्ट्रभर फिरत असताना दुग्धविकास मंत्री माझ्या जिल्ह्यातील आहेत, हे मी अभिमानाने सांगत असतो. यापुढे जर माझे काही काम अडले, तर मी आता हक्काने पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडे गेले पाहिजे. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. निवडणूक संपल्यावर राजकीय द्वेष सोडून देऊन सूडबुध्दीचे राजकारण आपल्याला बदलायचे आहे. याची सुरूवात मी स्वतःपासून करणार आहे. त्यामुळे हा विषय मी माझ्याकडून बंद करीत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री विखे पाटील यांचे मी आशीर्वाद घेणार आहे, माझी कामे मार्गी लावण्यासाठी त्यांचीही मदत घेणार आहे, असेही लंके म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...