Thursday, February 5, 2026
HomeनगरNewasa : खोके-बोक्यांचा आरोप करणार्‍यांनीच खोके घेवून मंत्रीपदे बहाल केली

Newasa : खोके-बोक्यांचा आरोप करणार्‍यांनीच खोके घेवून मंत्रीपदे बहाल केली

खा. संदिपान भुमरे यांची उध्दव ठाकरेंवर टिका

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

केवळ ऑनलाईन दिसणार्‍या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उठाव केला म्हणूनच जनतेला न्याय देता आला. आमचे पहिले मुख्यमंत्री केवळ ऑनलाईन दिसत होते. त्यामुळे आम्हाला उठाव करावा लागला. आमच्यावर खोके-बोकेंचा आरोपही झाला, पण आम्ही मात्र शिवसेनेशी प्रामाणिक राहून हातात झेंडे धरले, केसेस अंगावर घेतल्या, आणि सत्ता आल्यावर आम्हाला चांगले मंत्रिपद देण्यापेक्षा खोके बहाद्दरांना दिले गेले, अशी खोचक टीका छत्रपती संभाजीनगरचे शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे यांनी ‘उबाठा’ सेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

- Advertisement -

नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांचा शिरसगांव येथे अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार पांडूरंग अभंग, पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकर शिंदे, काशिनाथ नवले, सिद्धांत नवले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, किसनराव गडाख, भाजपाचे नेते सचिन देसरडा, ऋषिकेश शेटे, हरिभाऊ लंघे, डॉ. तेजेश्री लंघे, बाळासाहेब पवार, शंकरराव लोखंडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश डिके, राजेंद्र पोटे, अशोकराव मिसाळ, सुनिलराव वाघमारे, ज्ञानेश्वर पेचे, त्रिमुर्ती शैक्षणिक संकुलाच्या उपाध्यक्ष अ‍ॅड.स्नेहल घाडगे पाटील, प्रताप चिंधे, भाऊसाहेब वाघ उपस्थित होते.

YouTube video player

खा. भुमरे पुढे म्हणाले, त्यावेळचे ऑनलाईन दिसणार्‍या मुख्यमंत्री कधी आमच्याशी बोललेच नाही. त्यामुळे आम्हाला हा उठाव करावा लागला. आणि आमचा उठाव हा जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सत्कारणी लागला. माझ्यासारख्या सर्वसामान्य मानसाला शिवसेनेचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे केले. आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या मागे विखे कुटुंबियांची भक्कम साथ असल्यामुळे त्यांना लवकरच लाल दिवाही मिळू शकतो, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

डॉ. सुजय विखे म्हणाले, आमदार विठ्ठलराव लंघे यांना वेळोवेळी मोठी राजकीय संधी आलेली असतानाही त्यांनी ती सोडून दिली. दुसर्‍यांनीच या संधीचा लाभ उठवत या तालुक्याचे आमदार झाले. लंघे हे विकासात्मक दृष्टिकोन असणारे आणि त्यागी नेतृत्व असल्याचे त्यांनी सांगितले. या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार विठ्ठलराव लंघे यांना मिळालेल्या संधीमध्ये काहींनी मदत करण्यापेक्षा त्यांना पाडण्यासाठी सुपारी घेऊन रिंगणात उतरले, अशी टिका अप्रत्यक्षपणे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर केली. अशा माणसाला आता महायुती व विखे घराणे कधीच साथ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, सर्वसामान्य जनतेने विठ्ठलराव लंघे यांना आमदार केल्याचे डॉ. सुजय विखे सांगितले.

सत्काराला उत्तर देताना आ. विठ्ठलराव लंघे म्हणाले, सर्वसामान्य जनतेने आणि माझ्या लाडक्या बहिणींमुळे मला आमदारकीची संधी मिळाली. या संधीचे मी सोने करून जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही आमदार लंघे यांनी दिली. मी तुमच्या सारखाच सर्वसामान्य माणूस आहे. स्व. आण्णांनी आम्हाला प्रामाणिकतेची शिकवण दिली असल्याने माझ्यात कधीही बदल होणार नाही. तुम्ही मला कधीही भेटू शकता, पहिल्या आमदारांना भेटण्यासाठी सात पडदे ओलांडून जावे लागत होते. आता मला भेटण्यासाठी अशी गरज भासणार नाही. मला आपण कुठेही भेटू शकता, असे त्यांनी सांगितले. शैनेश्वर देवस्थानच्या अ‍ॅप घोटाळ्याबाबत आपण विधानसभेत आवाज उठविणार असून घोटाळेबाज लोकांसह ‘मास्टरमाईंड’चे काळे बुरखे फाडणार असल्याची रोखठोक भूमिकाही यावेळी त्यांनी स्पष्ट केली. तालुक्यातील देवस्थानांचा विकास करून पर्यटनक्षेत्र निर्माण झाले तर अनेकांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खा. संदिपान भुमरे म्हणाले, मी विठ्ठलराव लंघे यांचे दोन वाढदिवस पाहिले. पहिल्यांदा त्यांना जिल्हाध्यक्षपद दिले. दुसर्‍यांदा त्यांना आमदारपद मिळाले. आता पुढील वाढदिवसाला विखे पाटलांचा आशीर्वादाने लाल दिवा मिळण्याचे भाष्य करताच एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.

ताज्या बातम्या

Accident News : राहुरी विद्यापीठाजवळील अपघातात जखमी महिलेचा मृत्यू

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी कृषी विद्यापीठाजवळ नगर-मनमाड महामार्गावर 2 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या 50 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान...