Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या"तुमचं खरं काडतूस..."; संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

“तुमचं खरं काडतूस…”; संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

मुंबई | Mumbai

ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिक रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण (Beating) करण्यात आली आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनी माझा उल्लेख फडतूस असा केला, पण मी त्यांना सांगू इच्छितो की मी फडतूस नाही तर काडतूस आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) टीकेचा काल समाचार घेतला होता.

- Advertisement -

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांना अटक; Porn Star प्रकरण भोवलं

यानंतर आज संजय राऊतांनी (Sanjay Raut) फडणवीसांच्या या टीकेचा चांगलाच समाचार घेतला असून भिजलेले काडतूस खूप पाहिले, सीबीआय, ईडी बाजूला ठेवा मग काडतूसचा अर्थ सांगतो असे, म्हणत फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच फडतूस हा अतिशय सौम्य शब्द असून फडतूस म्हणजे अर्थहीन असेही राऊतांनी स्पष्ट केले आहे.

मुकेश अंबानी पुन्हा ठरले आशियातील सर्वात श्रीमंत, अदानी कितव्या स्थानावर?

यावेळी राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या टोळीतील गुंडांनी शिवसेनेच्या (ठाकरे गट) महिला पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांना मारहाण केली. या टोळीने अत्यंत निर्घृण आणि अमानुषपणे हा हल्ला केला, त्यात रोशनी शिंदे जखमी झाल्या. त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु हा सर्व प्रकार होत असताना पोलीस बघत होते. म्हणून उद्धव ठाकरे गृहमंत्र्यांना फडतूस म्हणाल्याचे त्यांनी सांगितले.

बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध तृप्ती देसाई?

पुढे ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) या सरकारला नपुंसक म्हटले आहे. पण उद्धव ठाकरे केवळ फडतूस म्हणाले. फडतूसचा अर्थ बेकार, अर्थहीन, युजलेस आणि बिनकामाचे असा होतो. ते स्वतःला काडतूस म्हणाले, पण अशी काडतुसं उडत नाहीत. तुमचं खरं काडतूस हे सीबीआय आणि ईडी आहे. म्हणूनच तुमची इतकी मस्ती आणि चरबी वाढली आहे. तुम्ही ईडी आणि सीबीआयला बाजूला ठेवून या. मग आम्ही तुम्हाला दाखवतो काडतूस कुठे घुसतं, असे राऊतांनी म्हटले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या