Saturday, January 24, 2026
Homeमुख्य बातम्या"शिंदे गट म्हणजे भाजपने पाळलेला..."; संजय राऊतांची खरमरीत टीका

“शिंदे गट म्हणजे भाजपने पाळलेला…”; संजय राऊतांची खरमरीत टीका

मुंबई | Mumbai

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. आजही त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला त्यावर मी शिंदे आणि त्यांच्यासह गेलेल्या चाळीस लोकांना पक्ष मानतच नाही.

- Advertisement -

शिंदे गटाला (Shinde Group) मी पक्ष मानत नाही. हा कोंबड्यांचा खुराडा आहे. त्यामुळे ते फडफड करत आहेत. यांच्या मानेवरून कधीही सुरी फिरवली जाईल, असं सांगतानाच 22 काय शिंदे गटाला पाच जागाही मिळणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

YouTube video player

काय म्हणाले राऊत?

मूळात तुम्ही जो काय शिंदे-मिंधे गट म्हणत आहात त्यांच्याकडे मी पक्ष म्हणून पाहातच नाही. भाजपाने पाळलेला कोंबड्यांचा तो खुराडा आहे. गावाला कोंबड्यांचे खुराडे असतात, कधीही कुठल्याही कोंबड्या कापल्या जातील. हे लक्षात घ्या. तो पक्ष नाहीच, कोंबड्या कॉक कॉक आरवत असतात. तसं ते बोलतात, पक्ष म्हणून त्यांच्याकडे काय बैठक आहे? काय विचारधारा आहे? निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह विकत दिलं म्हणजे तो पक्ष ठरत नाही.

Nashik Crime : गायींना इंजेक्शन देऊन करायचे बेशुद्ध अन्…; दोघांना अटक

त्या टोळीने ४८ जागा लढवाव्यात आम्हाला काही फरक पडत नाही. मागच्या लोकसभेत आमचे १९ खासदार होते. यावेळी ती संख्या कायम राहिल. कोण शिंदे मिंधे आहेत त्यांचे पाच खासदार आले तरी मोठी गोष्ट मानेन असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रपतींना सोहळ्याच निमंत्रण नाही

राष्ट्रपती आणि संविधानाच्या सन्मानाचा हा प्रश्न आहे. लोकसभेच्या अध्यक्षांनी पंतप्रधानांना बोलावलं आहे. या कार्यक्रम पत्रिकेत उपराष्ट्रपतीचं नाव नाही. राष्ट्रपतींनाही निमंत्रण नाही. प्रश्न इथे अडकला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही निमंत्रण दिलेलं नाही. हा एका पक्षाचा कार्यक्रम आहे का? काय आहे हे? त्यावर उत्तर द्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना या सोहळ्यापासून दूर का ठेवलं जातं आहे हे मोदींनी समोर येऊन सांगावं अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

New Parliament Inauguration : नवीन संसदेच्या उद्घाटनानिमित्त लॉन्च होणार 75 रुपयांचं नाणं, ‘अशी’ आहेत नाण्याची वैशिष्ट्ये

ऑस्ट्रेलियात लोकशाही आहे, पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी पाय धरले याचे कसले गोडवे गात आहात? असाही सवालही संजय राऊत यांनी केला आहे. आम्हीच निर्णय घेणार, आम्हीच ठरवणार, राष्ट्रपती कोण? सरन्यायाधीश कोण? आम्हीच सार्वभौम या मानसिकतेतून हे घडतं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...