Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूज"भाजपने आमच्यासोबत दुजाभाव केला"; मंत्रिपदावरून शिंदेंच्या शिवसेनेची खदखद

“भाजपने आमच्यासोबत दुजाभाव केला”; मंत्रिपदावरून शिंदेंच्या शिवसेनेची खदखद

एनडीएमधील वाद पेटणार?

मुंबई | Mumbai

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) बहुमत मिळवल्यानंतर भाजपाप्रणित एनडीएने सत्तास्थापन केली असून एनडीएचे प्रमुख नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी (९ जून) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत एनडीएतील ७२ खासदारांनी केंद्रीय मंत्रिपदाची (कॅबिनेट व राज्यमंत्री) शपथ घेतली. मात्र, सरकार स्थापन होऊन काही तास उलटले असतानाच आता एनडीएतील घटक पक्षांमधील खदखद समोर आली आहे. राज्यातील शिंदेंच्या शिवसेला एकच मंत्रीपद दिल्याने खासदार श्रीरंग बारणे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत भाजपवर टीका केली आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना बारणे म्हणाले की, “आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता, आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद मिळायला हवे होते. एनडीएमधील इतर घटक पक्षांचे एक-एक खासदार निवडून आले, त्यांना मात्र कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. मग आमच्या शिवसेनेसोबत भाजपने हा दुजाभाव का केला? असा सवाल श्रीरंग बारणे (Srirang Barne) यांनी उपस्थित केला.

तसेच भारतीय जनता पार्टीने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनाही मंत्रिपद द्यायला हवे होते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला न्याय मिळावा ही राज्यातील जनतेची भूमिका आहे. उदयनराजे भोसले हे तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत आणि ते वरिष्ठ देखील आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला मान मिळाला असता तर राज्यातील जनतेला अभिमान वाटला असता, असेही बारणे यांनी म्हटले.

पुढे बोलतांना बारणे म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) विस्तार होत असताना एनडीएने (NDA) न्यायिक भूमिका घ्यायला हवी होती. त्यांनी अजित पवारांच्या पक्षालाही मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यायला हवे होते. ही आमच्यासह महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा होती. अजित पवार यांनी मधल्या काळात आपल्या कुटुंबाशी वाईटपणा घेतला. ही गोष्ट आपण नाकारून चालणार नाही. तसेच ते भाजपा आणि एनडीएचे घटक पक्ष म्हणून काम करत आहेत. त्यामुळे अजित पवारांना न्याय मिळावा ही सर्वांची अपेक्षा आहे. तशी भूमिका ही भारतीय जनता पक्षाने घ्यायला पाहिजे होती, असेही खासदार श्रीरंग बारणे म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या