Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामला विजय चौकात फाशी द्या

मला विजय चौकात फाशी द्या

नवी दिल्ली | New Delhi

महाराष्ट्रात ईडी, सीबीआय या केंद्रीय संस्थांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. आमच्याकडून चूक झाली तर मला विजय चौकात फाशी द्या. आमच्यावर खटला चालवा. पण ईडी, सीबीआयचा गैरवापर चुकीचा आहे. आयुष्य खूप कलाटण्या देतं. आम्ही देखील सत्ताधारी बाकांवर बसलो आहोत. पारदर्शक काम करा आणि न्याय करा, असे त्यांनी सुनावले आहे.

- Advertisement -

सुळे यांनी मोदी सरकारवर सीबीआय, ईडी, आयकर या संस्थांचा गैरवापर केल्याचा आरोप केला. या संस्था स्वतंत्र असल्याचा दावा करतात मग कोणावर धाड पडणार हे 4-5 दिवस आधी ट्विटरवर कसं समजतं, असा सवाल त्यांनी केला आहे. याबाबत तारखेनुसार पुरावे सादर करू शकते, असंही त्यांनी लोकसभेत बोलताना नमुद केलं.

सुळे म्हणाल्या, सीबीआय, ईडी, आयकर या स्वतंत्र तपास संस्था स्वतंत्र आहेत तर मग आम्हाला ट्विटरवर कोणावर धाड पडणार हे 4-5 दिवस आधीच कसं समजतं? एखादा नेता 15 दिवसात तुरुंगात जाणार असं बोलणारे नेते भविष्य सांगणारे आहेत का? कोण आहेत ते? त्यांना कोणावर छापा पडणार हे कसं माहिती होतं? याचे दोनच अर्थ निघतात. तुम्ही एकतर मान्य करा की ईडी, सीबीआय या सर्व तपास संस्था सत्तेत असलेल्या लोकांकडून चालवल्या जातात. दुसरी गोष्ट म्हणजे ही माहिती लिक होत आहे का? जर एक पेपर लिक झाला तर मोठी चौकशी केली जाते. त्या अधिकार्‍याला तुरुंगात टाकलं जातं. आता जेव्हा तुमचे 2 कार्यकर्ते छापे कधी मारणार, तुरुंगात कधी टाकणार याची माहिती देतात. तुम्हाला कोणीही विचारणार नाही का? असं त्या म्हणाल्या.

पुढील आठवड्यात तिघे

केंद्रीय तपास यंत्रणांवरुन सुप्रिया सुळे लोकसभेत आक्रमक झाल्या होत्या. सुप्रिया सुळे यांच्या कालच्या प्रश्नावरून किरीट सोमय्या यांनी त्यांना आव्हान दिले. त्यांना मी आजच सांगतो की, पुढील आठवड्यात आणखी तिघांवर कारवाई होणार आहे, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या