अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले शहरात रस्त्याच्या कडेला काही चिन्ह दिसले. मात्र त्याखाली न्यायप्रविष्ट असे लिहिलेले नव्हते. याबाबत न्यायालयात खटला चालू आहे, त्यामुळे चिन्हाखाली न्यायप्रविष्ट लिहिणे बंधनकारक आहे. न लिहिणे हा अवमान आहे. हे फोटो काढून आपण न्यायालयात जाणार आहोत. ज्या अदृश्य शक्तीने पक्ष फोडले, चिन्ह नेले, काय काय केले त्यांना अजून शरद पवारांची ताकद माहीत नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
अकोले येथे त्या म्हणाल्या, जे समाजात द्वेष पसरवण्याचे काम करतील त्या विचारांच्या विरोधात आपण आहोत. बहिणी लोकसभेनंतर लाडक्या झाल्या. कारण माझ्या बारामतीकरांनी असा भावांना दणका दिला. या सत्ताधार्यांना बहिणींचे प्रेमच कळले नाही. नात्यात पैसे नसतात प्रेम असते व जिथे पैसे आले तिथे प्रेम राहत नसते. त्यामुळे नात्यात पैसे आले तर व्यवहार होतो प्रेम होत नाही. त्यामुळे यांनी लाडक्या बहिणींना पैसे दिले मात्र सुरक्षा व इज्जत दिली नाही. काल डॉ.जया थोरात यांची काय चूक होती? परंतु ही भाजपची संस्कृती आहे ती समोर आली, अशी टीका त्यांनी केली.