Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजएमपीएससी विद्यार्थ्यांच्या कमाल वयोमर्यादेत वाढ

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या कमाल वयोमर्यादेत वाढ

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारने घेतला. या निर्णयाचा शासन निर्णय काल जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली. वयोमर्यादा ओलांडल्याने नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता लागलेल्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

31 डिसेंबर, 2023 पर्यंत शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणार्‍या सर्व जाहिरांतीकरिता अर्ज करणार्‍या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत एक वर्ष इतकी शिथिलता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम-2024, 26 फेब्रुवारी, 2024 अन्वये राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता राज्य शासकीय सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. सदर अधिनियमातील तरतुदीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पदसंख्या व आरक्षण नमूद करून मागणीपत्रे सुधारित करण्याची कार्यवाही आवश्यक आहे.

याकरिता सुधारित मागणीपत्रानुसार जाहिराती प्रसिद्ध करण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2024 च्या नियोजित वेळापत्रकापेक्षा साधारणतः 9 ते 10 महिने विलंब झाला. त्यामुळे राज्यातील अनेक उमेदवारांनी शासन सेवेतील प्रवेशाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडली असल्याने असे उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करण्यास अपात्र ठरत आहेत. यानुषंगाने कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला.

यांना मिळणार लाभ
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 01 जानेवारी 2024 ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत पदभरतीसाठी ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि त्या जाहिरातींच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही, अशा जाहिरातीकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना सामान्य प्रशासन विभागाच्या 25 एप्रिल 2016 च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत एक वर्ष इतकी शिथिलता देण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...