Thursday, March 27, 2025
Homeक्रीडाधोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली | New Delhi –

भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनीने स्वत: इंस्टाग्राम पोस्ट करुन याची माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी धोनी आयपीएलमध्ये खेळणार आहे. ३९ वर्षीय धोनीने आपल्याला दिलेल्या समर्थन आणि पाठिंब्यासाठी सर्वांचे आभार मानले आहेत. MS Dhoni announces retirement from international cricket

- Advertisement -

धोनीने आपल्या इंस्टाग्रामवर शनिवारी (15 ऑगस्ट 2020) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोस्ट करुन निवृत्तीची घोषणा केली आहे.

आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये धोनीने म्हटले, तुमच्या सर्वांचे प्रेम आणि समर्थन याबद्दल धन्यवाद. या पोस्टसोबत धोनीने एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे.

धोनी डिसेंबर २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात आपला अखेरचा कसोटी सामना खेळला होता. याव्यतिरिक्त फेब्रुवारी २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात बंगळुरूमध्ये धोनीनं अखेरचा टी-२० सामना खेळला. तर विश्वचषक सामन्यांच्या उपांत्य फेरीतील सामना हा त्या अखेरचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. विश्वचषक सामन्यांनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर देला होता. परंतु त्यावेळी धोनी टेरिटोरियल आर्मी युनिटसह १५ दिवस काश्मीरमध्ये होता. ३१ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान तो काश्मीरमध्ये तैनात होता.

२०१९ विश्वचषकात भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर तत्कालीन निवड समितीने धोनीला नंतर स्थान दिलं नाही. संपूर्ण स्पर्धेत धोनीची संथ खेळी ही चर्चेत राहिली होती. २०१९ विश्वचषकानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणार होता. परंतु विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याच्याशी बोलून निवृत्तीचा निर्णय पुढे ढकलायला लावलं. मध्यंतरीच्या काळात संघात ऋषभ पंतची खराब कामगिरी लक्षात घेता धोनीला पुन्हा संघात स्थान द्यावी अशी मागणी होत होती. परंतु धोनीला पुन्हा संघात स्थान मिळालं नाही.

धोनीच्या कारकिर्दीवर एक नजर

एकूण सामने – ५३८

एकूण धावा – १७,२६६

शतके – १६

अर्धशतके – १०८

षटकार – ३५९

झेल – ६३४

स्टंपिंग – १९५

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Santosh Deshmukh Case : “धनंजय मुंडेंना पाठीशी न घालता त्यांच्यावर…”; मनोज...

0
मुंबई | Mumbai बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमु्ख यांची (Santosh Deshmukh Case) अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात वाल्मिक कराडच्या टोळीतील...