Friday, May 31, 2024
Homeक्रीडाधोनीच्या शिरपेचात मानाचा तुरा

धोनीच्या शिरपेचात मानाचा तुरा

नवी दिल्ली –

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम आता महेंद्रसिंह धोनीच्या नावावर जमा झाला आहे. सनराईजर्स हैदराबादविरुद्धचा

- Advertisement -

सामना धोनीचा आयपीएलमधला 194 वा सामना ठरला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून धोनी आणि रैना चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे सदस्य आहेत. 2016 आणि 2017 या दोन हंगामात चेन्नई संघावर कारवाई करण्यात आली होती. ज्यावेळी धोनी पुणे संघाकडून तर रैना गुजरातकडून खेळला. मात्र यंदाच्या हंगामात रैनाने खासगी कारणांमुळे माघार घेतलेली असल्यामुळे धोनीला आपल्या जवळच्या मित्राचा विक्रम मोडत अव्वल स्थान पटकावलं आहे.

महेंद्रसिंह धोनीने 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली. यानंतर युएईत सुरु असलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात धोनी सहभागी झाला आहे. आतापर्यंतच्या सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. गुणतालिकेत हा संघ तळाशी आहे. त्यातच गेल्या दोन सामन्यांत धोनी फलंदाजीसाठी उशीरा येत असल्यामुळे चेन्नईचे चाहते नाराज आहेत. मात्र धोनीने अशा परिस्थितीतही एक विक्रम आपल्या नावावर जमा केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या