Friday, May 3, 2024
Homeनगरमहावितरणने नगरमध्ये वसूल केले 22 कोटी

महावितरणने नगरमध्ये वसूल केले 22 कोटी

अहमदनगर (प्रतिनिधी) –

थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने वीज जोड तोडणी मोहीम हाती घेताच नगर शहरातून 22 कोटी रुपयांचा भरणा शासकीय

- Advertisement -

तिजोरीत करण्यात आला. वीज बिल भरण्यास नगर तालुक्यात फारसा उत्साह दिसत नसल्याचेही समोर आले.

महावितरणच्या नगर शहर विभागांर्तगत नगर शहर, पारनेर व नगर तालुका असा भाग आहे. नगर शहरातील वीज ग्राहकांकडे 42 कोटी, पारनेर 11 कोटी 51 लाख आणि नगर तालुक्यात 11 कोटी 68 लाख रुपये थकबाकी आहे. महावितरण कंपनीने वीज तोडण्याची मोहीम हाती घेताच नगर शहरातून 22 कोटी, पारनेरमधून 4 कोटी 60 लाख तर नगर तालुक्यातून 3 कोटी 36 लाख रुपये वसुली झाली. नगर शहरालगतच्या ग्रामीण भागातील जेरूर, जखणगाव, अकोळनेर, शेंडी सारख्या 23 गावांतील वीज ग्राहकांकडे 9 कोटी रुपयांची थकबाकी आहे. या गावातून फक्त 2 कोटी 88 लाख रुपये वसूल झाले आहेत. वसुलीची आकडेवारी पाहता नगर तालुक्यात सर्वात कमी 3 कोटी 36 लाख रुपये वसूल झाल्याचे दिसते.

सावेडीत 2.85 कोटींची वसुली

सावेडी कार्यालयातंर्गत सुमारे 22 हजार वीज ग्राहक आहेत. या ग्राहकांकडे 5 कोटी 87 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील किमान 3 कोटी 89 लाख रुपये जमा करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी-कर्मचार्‍यांना देण्यात आल्या होत्या. महावितरणने वसुलीची मोहीम सुरू करताच त्यातील तब्बल 2 कोटी 85 लाख रुपयांची वसुली झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या