Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजतरुणांसाठी खुशखबर! एसटीत १७ हजार चालक व सहाय्यक पदासाठी भरती होणार; परिवहन...

तरुणांसाठी खुशखबर! एसटीत १७ हजार चालक व सहाय्यक पदासाठी भरती होणार; परिवहन मंत्र्यांच्या माहिती

मुंबई | Mumbai
भविष्यात येणाऱ्या ८ हजार नवीन बसेस साठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने 17 हजार 450 चालक व सहाय्यक पदासाठी भरती राबवण्यात येणार असून येत्या २ ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल.अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या भरतीअंतर्गत एकूण १७ हजार ४५० पदे भरली जाणार आहेत. कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहाय्यक उमेदवाराला दरमहा ३० हजार पगार देण्यात येणार आहे. शिवाय, उमेदवारांना एसटीकडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, निवड झालेल्या उमेदवारांसोबत तीन वर्षांसाठी करार केला जाईल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ३०० व्या संचालक मंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

याबरोबरच उमेदवारांना एसटी कडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. बसेसची वाढवण्यात येणार असून त्यासाठी लागणारे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार बससेवा पुरविणे शक्य होणार आहे, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

YouTube video player

या भरतीचा मुख्य उद्देश एसटी महामंडळाच्या सेवेला अधिक बळकट करणे आणि प्रवाशांना उत्तम सुविधा पुरवणे आहे. १७ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांच्या भरतीमुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...