Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रएसटी संप काळात मृत्यू झालेल्यांच्या वारसांसाठी महामंडळाने घेतला 'हा' मोठा निर्णय

एसटी संप काळात मृत्यू झालेल्यांच्या वारसांसाठी महामंडळाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | Mumbai

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (msrtc) कर्मचाऱ्यांनी त्यांच्या काही प्रमुख मागण्यांसाठी २०२१ मध्ये दीर्घकाळ संप केला होता. याकाळात कर्मचाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले होते, त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल देखील उचलत या संपकाळात १२४ कर्मचाऱ्यांचा त्यांचे जीवन संपवले होते. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले होते.

अशा परिवारांसाठी शासनाने महत्वाचा (Maharashtra government) निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संपकाळातील कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. संप (strike) काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामाऊन घेण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.

परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील १२४ मृत एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना नोकरी मिळणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्याच कर्मचाऱ्यांच्या जागेवर नोकरी मध्ये सामावून घेत त्या कुटुंबाला आधार देण्यात येणार आहे. त्याबरोबरच या वारसांना सेवासलगतेचाही लाभ मिळणार आहे.

या संपामुळे एसटी (ST) महामंडळाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. अनेक महिने एसटी सेवा ठप्प ठेवण्यात आल्याने हे नुकसान महामंडळाला झेलावे लागले होते. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याची मागणी मान्य झाली नसल्याने हा संप अधिक ताणला गेला होता. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांची वाढ केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला होता, मात्र कर्मचाऱ्यांची मूळ मागणी अनिर्णितच राहिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या