नाशिक | Nashik
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनें’तर्गत जिल्ह्यातील ७ लाख २९३ महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले असून या बहिणींच्या बँक खात्यामध्ये (Bank Account) १७ ऑगस्टला शासनाकडून पहिला हप्ता वितरित केला जाणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, पहिल्या टप्प्यात रद्द झालेले सुमारे ३७ हजार ३०० महिला या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील लाभापासून वंचित राहणार आहेत.
हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्यात डेंग्यूचा कहर; सात महिन्यांत ‘इतके’ रुग्ण, तिघांचा मृत्यू
राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) घोषणा केल्यापासून महिलांमध्ये कागदपत्र जमवण्याची धावपळ सुरु झाली होती. जिल्ह्यात आतापर्यंत ७ लाख ३७ हजार ५८३ महिलांनी पहिल्या टप्पा अर्ज (Applications) दाखल केले होते. प्रत्यक्षात जिल्ह्यात नोंदणी झालेल्या ७ लाख ३७ हजार ५८३ महिलांच्या अर्जापैकी ७ लाख २९३ अर्ज समितीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले असून, त्याबाबतचा अहवाल राज्य शासनला पाठवण्यात आला आहे. त्यामुळे राखी पौर्णिमेपूर्वी येत्या १७ ऑगस्टला राज्यभरातील लाडक्या बहिणींना योजनेचा पहिला हप्ता वितरित केला जाणार असल्याने लाडक्या बहिणींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
हे देखील वाचा : अजित पवारांचा जनसन्मान यात्रेतून महिलांना शब्द; म्हणाले, “तुमच्या विश्वासाला…”
ऑनलाइन प्रणालीद्वारे (Online System) लाडक्या बहिणी अर्ज करीत असल्यामुळे प्रशासनाकडे सादर झालेल्या दोन लाख अर्ज छाननी प्रक्रियेत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये त्या अर्जानाही मंजुरी दिली जाणार आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यातून १० लाख लाडक्या बहिणीचे अर्ज येणे आहेत. त्यापैकी ७ लाख २९३ हजार अर्ज मंजूर झाले असून, २ लाख अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार आता आणखी १ लाख अपेक्षित अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लाडक्या बहिणींनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून अर्जाची नोंदणी तातडीने करावी. आपणाला शक्य नसल्यास अशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका अथवा सेतू कार्यालय यांच्या मदतीने हे अर्ज भरून घ्यावे. त्रुटी निष्पन्न झाल्यास त्यांची पूर्तता करून पुन्हा अर्ज दाखल करावा, असे आ- वाहन अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी पत्रकार परिषदेत केले.
हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात पावसाची हजेरी
अनेक बहिणी योजनेपासून वंचित
संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी, श्रावणबाळ, अपंगांना पेन्शन या चार योजनांमार्फत महिन्याला साधारणतः दीड हजार रुपये दिले जातात. नाशिक शहरात या योजनांचे १० हजार २६० लाभार्थी आहेत. तर संपूर्ण जिल्ह्यात एक लाखावर लाभार्थी असल्यामुळे एक लाख दहा हजारांवर महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार नसल्याचे समोर येत आहे.
निराधारांना हवा आधार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी या महिलांना पात्र ठरवले पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ महिलांनी व्यक्त केली आहे. सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शासन इतर योजनांच्या माध्यमातून दीड हजार रुपये देते. पण तेवढ्यात वैद्यकीय खर्चही निघत नाही. औषधोपचार व इतर खर्च मोठ्या प्रमाणात होत असल्याने दीड हजार रुपयांत महिना काढणे अवघड झाले आहे. त्यामुळे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनाही लाडक्या बहीण योजनेत समाविष्ट करुन घेण्याची मागणी महिला वर्गाकडून होत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा