Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजचला देवदर्शनला जाऊया…महाराष्ट्र सरकारची 'तीर्थ दर्शन योजना'; देशभरातील 'या' स्थळांना मोफत भेट...

चला देवदर्शनला जाऊया…महाराष्ट्र सरकारची ‘तीर्थ दर्शन योजना’; देशभरातील ‘या’ स्थळांना मोफत भेट देता येणार

मुंबई | Mumbai
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील वयोवृद्धांना तीर्थयात्रा करणं सुलभ आणि सोपं व्हावं यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ जाहीर केली आहे. या योजनेचे शासकीय परिपत्रक निघाला आहे. त्यात या योजनेच्या अटी, शर्ती, नियम वय आदींची इत्थंभूत माहिती जीआरमध्ये देण्यात आली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. ६० वर्षांवरील नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणार असून देशभरातील ६६ तीर्थक्षेत्रांसाठी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना ३० हजारांपर्यंत अनुदान मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रेची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू केले आहे.

राज्यातील या स्थळांचा समावेश
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थ यात्रेची सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने देशभरातील ७३ आणि राज्यातील ६६ अशा १३९ धार्मिक स्थळांची यादी तयार केली आहे. यामध्ये मुंबईतील १५ धार्मिक स्थळं या यादीत आहेत. यामध्ये सिद्धिविनायक मंदिर, चैत्यभूमी , विपश्यना शिवालय, एक आराधनालय, वांद्रे येथील माउंट मेरी चर्च आणि सेंट अँड्र्यूज चर्च, याशिवाय नाशिकमधील जैन मंदिर आणि नागपुरातील दीक्षाभूमी, जिथे आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला.

परराज्यातील या स्थळांचा समावेश
यासोबतच इतर राज्यातील , जम्मू काश्मीर, दिल्ली, उत्तराखंड, झारखंड, उत्तरप्रदेश, ओरिसा, बिहार, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, या राज्यातील प्रमुख देवस्थानांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये वैष्णोदेवी मंदिर, अमरनाथ यात्रा, अमृतसरमधील सुवर्ण मंदिर, चार धाम यात्रा, अयोध्येतील राम मंदिर, द्वारकामधील सोमनाथ मंदिर आणि ओडिशातील जगन्नाथ पुरी या प्रमुख धार्मिक स्थळांचा समावेश होतो.

कोणत्या अटी शर्थी असणार
ज्यांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपर्यंत आहे असे व्यक्ती पात्र प्रवास, निवास आणि भोजन खर्च कव्हर करण्यासाठी ३० हजार रुपये ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अर्जदारांना जोडीदार किंवा परिजनांसोबत येण्याची परवानगी आहे. राज्यस्तरावर योजनेचे परीक्षण आणि आढावा घेण्यासाठी १७ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावर सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त सदस्य सचिव म्हणून सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यस्तरावर सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील.

महाराष्ट्रातील या स्थळांचा समावेश
१. सिद्धिविनायक मंदिर मुंबई, २. महालक्ष्मी मंदिर मुंबई ३. चेत्यभूमी दादर मुंबई ४. माउंट मेरी चर्च (वांद्रे) मुंबई ५. मुंबादेवी मंदिर मुंबई ६. वाळकेश्वर मंदिर मलबार हिल मुबई ७. विश्व विपड्यना पॅगोडा गोराई मुंबई ८. चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ, कॅवेल मुंबई ९. सेंट अंडरयू चर्च मुंबई १०. सेट जान द बँप्टिस्ट चर्च , सीप्झ औद्योगिक क्षेत्र, अंधेरी, मुंबई ११. सेंट जॉन द बप्टिस्ट चर्चे, मरोळ मुंबई १२. गोदीजी पार्श्वत मंदिर मुंबई १३. नेसेट एलियाहू मुंबई १४. शार हरहमीम सिनेगॉग , मस्जिद भंडार मुंबई १५. मॅगेन डेव्हिड सिनेगॉग , भायखळा मुंबई

१६. सेंट जॉन द बँप्टिस्ट चर्च ठाणे १७. अग्यारी / अग्निमंदिर ठाणे १८. मयुरेश्वर मंदिर , मोरगाव पुणे १९. चितामणी मंदिर , थेऊर पुणे २०. गिरिजात्मज मंदिर , लेण्याद्री पुणे २१. महागणपती मंदिर , रांजणगाव पुणे २२. खंडोबा मंदिर , जेजुरी पुणे २३. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर , आळंदी पुणे २४. भीमाशंकर ज्योतिलिंग मंदिर, खेड तालुका पुणे २५. संत तुकाराम महाराज समाधी मंदिर , देहू पुणे २६. संत चोखामेळा समाधी , पंढरपूर सोलापूर २७. संत सावतामाळी समाधी मंदिर अरण ता. माढा सोलापूर २८. विठोबा मंदिर , पंढरपूर सोलापूर २९. शिखर शिगणापूर सातारा ३०. महालक्ष्मी मंदिर , कोल्हापूर ३१. जोतिबा मंदिर कोल्हापूर

३२. जैन मंदिर, कुंभोज कोल्हापूर 33. रेणुका देवी मंदिर , माहूर नांदेड ३४. गुरु गोविद सिंग समाधी, हजूर साहिब , नांदेड ३५. खंडोबा मंदिर, मालेगाव नांदेड ३६. श्री संत नामदेव महाराज देवस्थान, उब्रज ता. कंधार नांदेड ३७. तुळजा भवानी मंदिर , तुळजापूर धाराशिव ३८. संत एकनाथ समाधी, पैठण छत्रपती संभाजीनगर ३९. घृष्णेश्वर ज्योतिलिंग मंदिर , वेरूळ छत्रपती संभाजीनगर ४०. जैन स्मारके , एलोरा लेणी छत्रपती संभाजीनगर

४१. विघ्नेश्वर मंदिर, ओझर नाशिक ४२. संत निवृत्तीनाथ समाधी, त्र्यंबकेश्वर जवळ नाशिक ४३. त्र्यंबकेश्वर शिव मंदिर , त्र्यंबकेश्वर नाशिक ४४. Faery नाशिक ४५. सप्तशंगी मंदिर , वणी नाशिक ४६. काळाराम मंदिर नाशिक ४७. जैन मंदिरे, मांगी-तुंगी नाशिक ४८. गजपंथ नाशिक ४९. संत साईबाबा मंदिर, शिर्डी अहमदनगर ५०. सिद्धिविनायक मंदिर , सिद्धटेक अहमदनगर ५१. शनी मंदिर , शनी शिंगणापूर , अहमदनगर ५२. श्रीक्षेत्र भगवानगड , पाथर्डी अहमदनगर

५३. बल्लाळेश्वर मंदिर , पाली रायगड ५४. संत गजानन महाराज मंदिर , शेगाव बुलढाणा ५५. एकवीरा देवी , काली पुणे ५६. श्री दत्त मंदिर, औदुंबर सांगली ५७. केदारेश्वर मंदिर बीड ५८. वैजनाथ मंदिर, परळी बीड ५९. पावस रत्नागिरी ६०. गणपतीपुळे रत्नागिरी ६१. मार्लेश्वर मंदिर रत्नागिरी ६२. महाकाली देवी चंद्रपूर ६३. श्री. काळेश्वरी उर्फ काळुबाई मंदिर सातारा ६४. अष्टदशभुज (रामटेक) नागपूर ६५. दीक्षाभूमी नागपूर ६६. चिंतामणी (कळंब) यवतमाळ.

देशातील या स्थळांचा समावेश?
१. वैष्णो देवी मंदिर २.यमुनोत्री मंदिर, उत्तरकाशी ३. कामाख्यादेवी मंदिर ४. महाकालेश्वर मंदिर, उज्जैन ५. अमरनाथ गुहा ६. बैद्यनाथ धाम, देवघर ७. गुवाहाटी ८.ओंकारेश्वर मंदिर, ममलेश्वर मंदिर खंडवा, ब्रह्मपुरी ९. सुवर्ण मंदिर १०. काशी विश्वनाथ मंदिर ११. महाबोधी मंदिर १२. श्री रंगनाथस्वामी मंदिर १३. अक्षरधाम मंदिर, १४. वाराणसी १५. रणकपूर मंदिर, पाली १६. गोमटेश्वर मंदिर१७. श्री दिगंबर जैन लाल मंदीर १८. इस्कॉन मंदिर, वृंदावन १९. अजमेर दर्गा २०. विरुपाक्ष मंदिर, हम्पी

२१. श्री लक्ष्मीनारायण मंदीर २२. श्रीराम मंदिर, अयोध्या २३. सोमनाथ मंदिर, वेरावळ २४. चेन्नकेशव मंदिर, बेलूर २५. बद्रीनाथ मंदीर २६. सूर्य मंदिर, कोणार्क २७. द्वारकाधीश मंदिर, द्वारका २८. अन्नपूर्णेश्वरी मंदिर, होरानाडू २९. गंगोत्री मंदीर (उत्तरकाशी) ३०. श्री जगन्नाथ मंदिर, पुरी ३१. नागेश्वर मंदिर, द्वारका ३२. महाबळेश्वर मंदिर, गोकर्ण ३४. केदारनाथ मंदीर ३५. लिंगराज मंदिर, भुवनेश्वर ३६. सांची स्तूप

३७. भूतनाथ मंदिर, बदामी ३८. नीलकंठ महादेव मंदीर ३९. मुक्तेश्वर मंदिर,भुवनेश्वर ४०. खजुराहो मंदिर ४१. मुरुडेश्वर मंदिर, मुरुडेश्वर ४२. आयहोल दुर्गा मंदिर ४३. कांचीपुरम मंदिर, कांचीपुरम ४४. रंगनाथस्वामी मंदिर, त्रिची ४५. अरुणाचलेश्वर मंदिर ४६. श्रीकृष्ण मंदिर, उडुपी ४७. कैलासनाथ मंदिर, कांचीपुरम ४८. एकंबरेश्वर मंदिर, कांचीपुरम ४९. सारंगपानी मंदिर, कुंभकोणम ५०. वीर नारायण मंदिर, बेलावडी

५१. किनारा मंदिर, महाबलीपुरम ५२. मुरुगन मंदिर, तिरुचेंदूर ५३. श्री पद्मनाभस्वामी मंदिर ५४. तिरुपती बालाजी मंदिर ५५. गुरुवायूर मंदिर, गुरुवायूर ५६. वडक्कुन्नाथन मंदिर, त्रिशूर ५७. अटुकल भगवती मंदिर ५८. मल्लिकार्जुन मंदिर, श्रीशैलम ५९. पार्थसारथी मंदिर, अरनमुला ६०. शबरीमाला मंदिर ६१. श्रीकृष्ण मंदिर, गुरुवायूर ६२. बृहदीश्वर मंदिर, तंजावर ६३. थिरुनेल्ली मंदिर, वायनाड ६४. वैकोम महादेव मंदिर, वर्कला

६५. तिरुवल्ला मंदिर, तिरुवल्ला ६६. मीनाक्षी मंदिर, मदुराई ६७. शिवगिरी मंदिर, वर्कला ६८. श्री सम्मेद शिखरजी ६९. शत्रुजय हिल ७०. रामनाथस्वामी मंदिर ७१. गिरनार ७२. देवगड ७३. पावापुरी ७४. रणकपूर ७५. दिलवाडा टेंम्पल ७६. उदयगिरी

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या