Thursday, November 14, 2024
Homeनगर‘बहिण माझी लाडकी’चे अ‍ॅप सुरू

‘बहिण माझी लाडकी’चे अ‍ॅप सुरू

पहिल्याच दिवशी ऑनलाईन ट्राफीक जाम || जामखेड तालुक्यातून पहिली नोंदणी

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

मागील आठवड्यात घोषणा केलेल्या बहिण माझी लाडकी योजनेसाठी महिला बालकल्याण विभागाचे अ‍ॅप कार्यान्वित झाले आहेत. मात्र, पहिल्याच दिवशी महिला अर्जाची गर्दी झाल्याने अनेक तालुक्यात ऑनलाईन ट्राफीक जाम झाल्याने प्रशासन हतबल झाल्याचे दिसून आहे. तसेच काही ठिकाणी नव्याने सुरू केलेले अ‍ॅप दिसत होते. तर काही ठिकाणी ते ओपन होत नव्हते. दरम्यान, जिल्ह्यात या योजनेसाठी पहिली नोंदणी जामखेड तालुक्यात पूर्ण झाली असून ऑफलाईन पध्दतीने अर्ज संकलन होण्यास सुरूवात झाली असल्याची माहिती महिला बालकल्याण विभागाच्यावतीने देण्यात आली.

- Advertisement -

बहिण माझी लाडकी योजनेचा पहिला टप्पा राबवण्यासाठी सुरूवातीला 15 जुलैपर्यंत कालावधी असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यामुळे सोमवारपासून जिल्हाभरातील सेतू कार्यालय, आपंल सरकार केंद्र याठिकाणी महिलांची विविध दाखले आणि योजनेत ऑनलाईन नोंदणीसाठी गर्दी केली होती. दरम्यान, मंगळवारपासून योजनेचे अ‍ॅप सुरू झाले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी येज होत्या. तर दुसरीकडे सेतू केंद्रात दाखल्यासाठी गर्दी झाल्याचे दिसून आले. नगरमधील सेतू केंद्रात एकाच दिवशी 1 हजार 200 उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अर्ज आले असून डोमासाईलसाठी 400 अर्ज नगर तहसीलकडे प्राप्त झाले आहेत.

यापैकी 250 उत्पन्नाचे दाखले व 60 डोमासाईल दाखले देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा व्हावी व त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रासाठी जिल्हाभरात सेतू केंद्रावर गर्दी होतांना दिसत आहे. महिला बालकल्याण विभागाच्यावतीने योजनेसाठी ऑनलाईन ऑप तयार करण्यात आले असून यात माहिती भरतांना अडचणी येत आहे. हे अ‍ॅप नविन असल्याने हा प्रकार होत असल्याचे सांगण्यात आले.

अ‍ॅपमध्ये भरावी लागणार ही माहिती
महिले नाव, यात लग्नाआधीचे आणि लग्नानंतरचे नावाचा समावेश असून जन्म दिनांकासह अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, जन्म गावाचे तालुका, शहर आणि पोस्टाच्या पिनसह पत्ता, मोबाईल आणि आधार क्रमांक, वैवाहिक स्थिती, बँक खाते आयएसफसी कोडसह, नारी शक्तचा प्रकार आणि योजनेसाठी आवश्यक शासकीय दस्तावेज, फोटो आणि स्वयंघोषणापत्र यांची माहिती योजनेसाठी अर्जावर आणि ऑनलाईन भरून द्यावी लागणार आहे.

‘सार्वमत’ने आवाज उठवला
मुख्यमंत्री बहिण माझी लाडकी योजनेत येणार्‍या अडचणी, रहिवासी प्रमाणपत्र काढतांना येणारी अडचण, लग्नाआधीचे नाव आणि लग्नानंतरचे नावाची अडचण, योजतून 61 ते 64 वयोगटात सुटणार्‍या महिला यासह राज्याबाहेरून लग्न होवून आलेल्या महिला यांना योजनेच्या लाभाबाबत येणार्‍या अडचणीबाबत ‘सार्वमत’ ने आवाज उठवला होता. तसेच सोमवारी महिला बालकल्याण मंत्री यांच्या ऑनलाईन बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी स्पष्टपणे मांडणी केली होती. त्यावर मंत्री तटकरे यांनी येणार्‍या अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानूसार योजनेच्या अंमलबजावणी बदल होणार आहे. नगरकरांनी उठवलेल्या आवाजामुळे शक्य झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी यावेळी व्यक्त केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या