Tuesday, March 25, 2025
Homeनगरमुळानदी पात्रात तरूणाचा मृतदेह आढळला

मुळानदी पात्रात तरूणाचा मृतदेह आढळला

वळण |वार्ताहर| Valan

राहुरी (Rahuri) तालुक्यातील वळण परिसरातील मुळानदी पात्रात (Mula River) एका 40 वर्षीय विवाहित तरुणाचा मृतदेह (Youth Dead Body) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आदिनाथ बाळासाहेब आढाव (रा. वळण ता. राहुरी) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. सोमवार दि. 10 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता ही घटना उघडकीस आली आहे. राहुरी तालुक्यातील वळण (Valan) येथील आदिनाथ बाळासाहेब आढाव हा शनिवारी मध्यरात्री आपल्या राहत्या घरातून गायब झाला होता. त्यानंतर त्याची मोटारसायकल वळण अमरधाम मुळा नदीच्या (Mula River) तीरावर आढळून आली होती. दरम्यान त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो मिळून न आल्याने राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

- Advertisement -

सोमवार दि. 9 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी वळण मुळा नदी पात्रात त्याचा मृतदेह तरंगताना काही नागरिकांना आढळून आला. सदर मृतदेह स्थानिक नागरीकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. घटनेची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळताच घटनास्थळी पोलीस हवालदार अशोक शिंदे, दिपक फुंदे, दिगंबर सोनटक्के आदि पोलिस पथकाने धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत अदिनाथ आढाव यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात (Rahuri Police Station) सध्या आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढिल तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...